विकसित शहर बनविण्याचे आश्वासन : तारिक कुरैशी यांच्या नेतृत्वात भेट तुमसर : तुमसरचे नवनिर्वाचित भाजपचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे तथा नगरसेवकांनी केंद्रीय सडक परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. भेटी दरम्यान शिष्टमंडळाने तुमसर शहराच्या विकासाकरिता ना. गडकरी यांना निवेदन दिले. भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांच्या नेतृत्वात नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे तथा नवनिर्वाचित नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरात सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शहराच्या विकासाकरिता निवेदन दिले. ना. गडकरी यांनी भविष्यात तुमसर शहर एक विकसित शहर होण्याकरिता शासनस्तरी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, नगरसेवक सुनिल पारधी, रजनीश लांजेवार, मेहताबसिंग ठाकुर, पंकज बालपांडे, गीता कोंडेवार, विक्रम लांजेवार, सचिन बोपचे, राजू गायधने, किरण जोशी, भारती धार्मिक, शिला डोये, अर्चना भुरे यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
नितीन गडकरी यांची तुमसरच्या नगरसेवकांनी घेतली भेट
By admin | Published: January 05, 2017 12:38 AM