शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

ना कॉल ना ओटीपी तरी बँकेतून पैसे गायब, फ्री गेम, अनोळखी ॲप परमिशन नको रे बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:25 AM

इंद्रपाल कटकवार भंडारा : झटपट पैसे कमाविण्याच्या नादात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे सर्रास प्रकार बघायला मिळत ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : झटपट पैसे कमाविण्याच्या नादात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे सर्रास प्रकार बघायला मिळत आहेत. उल्लेखनीय म्हणजे ना कॉल, ना ओटीपी तरी बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी ॲप डाऊनलोड करताना ‘ऑटो रीड ओटीपी’ परमिशनची परवानगी घेतली जात आहे. यामधूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी आम्ही अमुक-तमुक बँकेतून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहोत, अशी कारणे सांगून ग्राहकांना प्रथम कॉल व त्यानंतर ओटीपी विचारून त्यांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केली जायची. विश्वास पात्र गोष्ट बोलून ग्राहकांची अशी फसवणूक आता कालबाह्य झाल्याने डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत. गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ५८ घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी २०१९ मध्ये ५६ प्रकरणे भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दाखल झाली होती. दरम्यान, गत पाच महिन्यांत सायबर माध्यमातून फसवणुकीचे ९ गुन्हे दाखल झाले आहेत.

बॉक्स

पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच

यापूर्वी ओटीपी किंवा फोन कॉल करून ग्राहकांची फसवणूक केली जायची. त्यावेळीही पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच होती. अनेकदा फसवणूक करणारा इसम अनोळखी नंबरहून व प्रीपेड सिम कार्ड वापरून बोलायचा. दुसऱ्या वेळी तो नंबर लावल्यास तो नंबर ‘आऊट ऑफ कव्हरेज एरिया’ किंवा ‘स्विच ऑफ’ असा दाखवितो. आताही तीच बाब घडत आहे. त्यामुळे लोकेशन व अन्य बाबींचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बॉक्स

अनोळखी ॲप नकोच

डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक ॲप्लिकेशन्स आले आहेत. हेच अप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नादात अनेक ग्राहक ‘सर्व टर्म्‌स आणि सर्व कंडिशन्स अप्लाय’ करतात. त्यामध्येच ‘ऑटो ओटीपी रीड’ याला सुद्धा परवानगी देऊन टाकतात. अनोळखी ॲप डाऊनलोड केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. परिणामी आता स्वतः जागरूक होऊन नागरिकांनीच अनोळखी ॲप नको रे बाबा, अशी बाब म्हणण्यास सुरुवात केली आहे. फसवणुकीचे गुन्हेही असल्याच ॲपमधून डेटा चोरी करून घडत आहेत.

बॉक्स

पंधरा लक्ष रुपयांची फसवणूक होते दरवर्षी

भंडारा जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी पंधरा लक्ष रुपयांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. यापेक्षा जास्त रकमेने अनेकांची फसवणूक झाल्याचेही ऐकिवात आहे; परंतु अनेकदा भीतीपोटी नागरिक समोर येत नाहीत.

कोट बॉक्स

नागरिकांनी अनोळखी फोन कॉल किंवा एसएमएसला प्रतिसाद तसेच अनोळखी ॲप डाऊनलोड करू नये. त्यावरूनच फसवणूक करणारे सहजरीत्या मोबाइल किंवा लॅपटॉप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक संसाधनातील डेटा चोरी करतात. त्यामधूनच हे सर्व प्रकार घडत आहेत. कुठलीही तक्रार असल्यास पोलीस ठाण्यात तात्काळ द्या. पोलीस त्यावर त्वरित दखल घेतील.

-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.