तुमसर तालुक्यातील माडगी येथील सर्वात मोठा स्मशान घाट आहे. रात्रीच्या सुमारास ही येथे अंत्यसंस्कार करण्यात येतात. मंगळवारी रात्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेहाचे कपडे गाव शिवारात फेकण्यात आले. यापूर्वी काही मृतदेह अर्धवट जळण्याचे प्रकार पुढे आले होते. भटक्या कुत्र्यांनी मानवी अवयव गावात आणले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोविड संसर्गाच्या काळ असल्या कारणामुळे रोगराई पसरण्याची गावात भीती व्यक्त करण्यात आली. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना यावर कडक कारवाई करण्यास सांगितले.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी माडगी घाटावर बाहेरगावाहून येणाऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय सरपंच गौरीशंकर पंचबुद्धे, उपसरपंच संजय अटराये यांनी घेतला.
कोट
माडगी घाट परिसरात सर्वत्र अर्धवट जळलेले लाकडे व कपडे पडलेले होते. त्या सर्वांना ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जाळले.
मंगळवारी रात्री मृतदेहाचे कपडे गाव शिवारात फेकण्यात आले. भटक्या कुत्र्यांनी मानवी अवयव गावात आणले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरल्याने मनाई करण्यात आली आहे.
गौरीशंकर पंचबुद्धे,
सरपंच, माडगी