आवारात आढळल्या शिशा : कारवाईतील देशी-विदेशी दारूवर मारला तावप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘पिने वालोको पिनेका बहाना चाहीए’ या गाण्यावर आजही अनेकजण बेधुंद होऊन नाचतात. खरोखरंच गितकाराने बनविलेल्या या गाण्याला आजही अनेक ठिकाणी सार्थकी ठरविण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार शासकीय कार्यालयाच्या आवारात होत असल्यास त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतू हे वास्तव भंडारा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात पहावयास मिळाले आहे.बातमीचे शीर्षक वाचून आश्चर्याचा धक्का बसण्यावाचून राहणार नाही. परंतु हे सत्य ‘लोकमत’च्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी व तेथे येणाऱ्या नागरिकांनी केलेल्या कार्याचा हा ‘पोस्टमार्टम’चं आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या राजीव गांधी चौक ते मिस्कीम टँक चौक दरम्यानच्या मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. शासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल देणारे शासकीय कार्यालय म्हणून हे कार्यालय अग्रस्थानी आहे. विनापरवाना दारूची वाहतूक, व परजिल्ह्यातील जाणारी दारू यावर नियंत्रण ठेवून ती पकडण्याची कर्तबगारी येथील अधिकारी व कर्मचारी वर्षभर करतात. या पकडलेल्या दारूचा हिशेब याच कार्यालयात ठेवण्यात येतो. याची सर्वसामान्यांना काही देणेघेणे नाही. कदाचित याच संधीचा लाभ येथील अधिकारी किंवा कर्मचारी घेत असून पकडलेल्या दारूंवरच ताव मारण्यात येत असावा, याबाबत आता दुमत नाही. यावर्षी १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत सदर विभागाने १ हजार ८४ केसेस मधून सुमारे दोन कोटींचे महसूल प्राप्त केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कारवाईतील दारूसाठा हा येथीलच गोदामात ठेवण्यात येतो. मात्र, अनेकदा प्रकरणावर पांघरून घालण्यासाठी कदाचित येथील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना ओली पार्टी दिली जात असवी, आणि तिही शासकीय कार्यालयातचं. किंवा कारवाईत पकडलेला दारूसाठा शासकीय दफ्तरी कमी नोंदवून त्यातील दारूवच ताव मारण्यात येत असावा, असे येथे आढळलेल्या रिकाम्या बॉटल्सवरून तर हे सिद्ध होते. यावरूनच भंडारा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय ‘दारूअड्डा’ बनला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.भंगार ट्रकजवळ अस्ताव्यस्त रिकाम्या शिशाराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रस्तावरील प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोरच एक भंगारात पडलेला ट्रक दिसून येतो. लगतच मोडक्यातोडक्या टिनांचे वाहनांचे ‘स्टँड’ आहे. यामागे कर्मचाऱ्यांचे शौचालय व मुतारीघर आहे. या परिसरात ‘लोकमत’च्या प्रस्तूत प्रतिनिधीने सोमवारला पाहणी केली असता. धक्कादाय बाबी समोर आल्या. चक्क देशी-विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटल्स येथे पडून होत्या. यावरूनच या कार्यालयात दारूच्या पार्ट्या नेहमी होत असाव्या, याबाबत शंका उपस्थित होते.
उत्पादन शुल्क विभाग नव्हे दारूचा अड्डाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 12:19 AM