राजेश बांते यांचा आरोप : फॉर्म देण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळलाखनी : प्रधानमंत्री जनधन योजनेला संपूर्ण राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असताना लाखनी तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या असहकारामुळे जनधन योजनेपासून अनेकांना वंचित राहण्याची वेळ येत असल्याचा आरोप माजी जि.प. सदस्य राजेश बांते यांनी केला आहे.भाजपा सरकारच्या सर्व सामान्यांसाठी असणाऱ्या अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजनापासून लोकांना वंचित राहण्याची वेळ येत आहे. लाखनी येथे स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र या तीन राष्ट्रीयकृत बँक आहेत. सावरी (मुरमाडी) येथे स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा आहेत. राष्ट्रीयकृत बँकेत गेल्यानंतर सदर योजनांच्या फॉर्मची मागणी केल्यानंतर फॉर्म देण्यास अधिकारी व कर्मचारी वर्ग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप राजेश बांते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर या वंचित घटकांसाठी विमा सुरक्षेचे कवच प्राप्त करून देण्यासाठी जीवनज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजना सुरु केली आहे. याचा फायदा गावखेड्यातील लोकांना होते. आवश्यक असतानीही बँकेचे प्रशासन उदासीन असल्याचा आरोप बांते यांनी केला आहे. बँकेत खाते उघडून किंवा ज्याचे बँकेत खाते आहे अशा प्रत्येक व्यक्तीने विमा योजनेचा फॉर्म भरून घ्यावा असे आवाहन बांते यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जनधन योजनेकरिता बँक कर्मचाऱ्यांचे असहकार
By admin | Published: May 25, 2015 12:38 AM