शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

नियमबाह्य भाजीपाला मार्केटला अभय

By admin | Published: October 08, 2016 12:34 AM

नियमबाहय, अवैधरितीने सुरु झालेल्या ठोक भाजी मार्केटला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: शिवसेना आंदोलनाचा इशाराभंडारा : नियमबाहय, अवैधरितीने सुरु झालेल्या ठोक भाजी मार्केटला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. यावर योग्य तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करण्यता येईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी दिला आहे.भंडारा शहरातील जलशुध्दीकरण केंद्राजवळील १.५० एकर जागेवर नियमबाहयरित्या, अवैधपणे ठोक भाजी मार्केटचे बांधकाम जेमतेम सुरु झाले असतांनी शिवसेनातर्फे सर्वप्रथम याला विरोध केला. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सदर कामावर स्थगिती दिलेली होती. या स्थगिती दरम्यान बांधकाम पुर्णपणे बंद करावयाची जवाबदारी नगर पालिका प्रशासनाची होती. परंतु जवाबदारीचे भान न ठेवता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळयादेखील भाजी मार्केटचे काम पुर्ण होवून भाजी मार्केट सुरु देखील झाले. तेव्हापासून अनेकदा या विषयांवर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, मुख्यमंत्र्यापर्यंत शिवसेनातर्फे निवेदने देण्यात आलीत.वास्तविक ही जागा चार वर्षापुर्वी मंजुर झालेल्या परंतु त्यासाठी अद्यापही जिल्हा प्रशासनाला जागा न मिळू शकणाऱ्या स्वतंत्र्य महिला रुग्णालयासाठी शिवसेनातर्फे मागण्यात आलेली होती. परंतु विषयाचे गांर्भीर्य न कळलेल्या लोप्रतिनिधीनी भाजी मार्केटला ही जागा द्यावी, याकरिता प्रयत्न केले, हे या दुर्देव म्हणावे लागेल. शिवसेनेतर्फे एक वर्षापासून या विषयावर प्रशासनाशी, शासनाशी भांडून स्वाक्षरी मोहीम राबवून ११ हजार सहयानिशी मुख्यमंत्र्यांना निवेदन अशा अनेक प्रकारे हा विषय तेवतच ठेवला. परंतु राजकीय नेत्यांच्या आर्शीवादाने ठोक भाजी मार्केट सुरु झाला, त्यातही नियमांना धाब्यावरच बसविण्यात आले, बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नगर पालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र न घेता, इतर ठोक भाजी व्यापाऱ्यांचा नगर पालिकेशी करारपत्र न होताच अनिधिकृतपणे भाजी मार्केट सुरु झाले. अधिकारी मात्र तोंड पाहतच असल्याने त्यांच्यावर संशय येत असल्याचेही रेहपाडे यांनी म्हटले आहे.नगर पालिका प्रशासनाने ज्या बीटीबी संस्थेशी करारनामा करुन ही जागा ठोक भाजी मार्केटला दिली. मागील वर्षभरापासून चालणाऱ्या या सर्व गैरप्रकाराला पुर्ण विराम देवून ठोक भाजी मार्केटच्या नावाने अवैधरित्या, नियमाबाहयरितीने उभे केलेले बांधकामाची जागा ही जिल्हयातील एकमेव होणाऱ्या महिला रुग्णालयासाठी देवून जिल्हयातील महिला रुग्णांना न्याय देण्यात यावा. प्रशासनाने वेळीच या मागणीची दखल न घेतल्यास शिवसेनातर्फे १५ आॅक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा येणार आहे तो मोर्चा भाजी मार्केटकडे वळता करु अशा इशाराही प्रशासनास दिला आहे. त्या दरम्यान काही परिस्थिती उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल यांची नोंद घ्यावी, असा इशारा शिवसेना तर्फे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, सुरेश धुर्वे, अनिल गायधने, ललित बोंद्रे, नितीन साकुरे, सतिश तुरकर, न.प.सदस्य किरण व्यवहारे, मयुर लांजेवार, पंकज दहीकर, संदिप सार्वे, रोशन कळंबे, सुधीर उरकुडे, जग्गु हजारे, नितेश मोगरे, आशीष महाकाळकर, आकाश जनबंधु, प्रविण कळंबे, प्रकाश देशकर, मयुर जोशी आदींनी केली आहे.(नगर प्रतिनिधी)