आठ शिक्षक अजूनही रूजू नाही : मुख्याध्यापक संघाच्या सभेत अश्वासनमोहाडी : जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विनाअनुदानित तत्वावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या रिक्त असलेल्या जागा भरण्याची नाहरकत प्रमाणपत्र प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याची ग्वाही शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी.एल. थोरात यांनी भंडारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत दिली.खासगी व्यवस्थापन असणाऱ्या शाळांमध्ये विनाअनुदानित तत्वावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा विषय मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी (माध्य.) भाऊसाहेब थोरात यांच्या कक्षात झालेल्या सहविचार सभेत मांडला होता. या सभेत शिक्षणाधिकाऱ्यांनी लवकरच येत्या पंधरवाड्यात मुख्याध्यापकांना त्या रिक्त जागा भरण्याची एनओसी देण्याचे अभिवचन दिले. तथापि आलेल्या ११ प्रस्तावासह अद्यावत रोस्टर, समांतर आरक्षण यासह संबंधित दस्ताऐवज मुख्याध्यापक, संस्था सचिवांनी तात्काळ कार्यालयास सादर करावे असे सांगितले. मागील वर्षी जिल्ह्यातील ११३ शिक्षक अतिरिक्त होते. त्यापैकी ३७ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. यापैकी ८ शिक्षक अजूनही रूजू झालेले नाही. तसेच २०१६ - १७ च्या संच मान्यतेमधून अतिरिक्त शिक्षक किती याची माहिती घेणे सुरु आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदांची माहिती शासनास देण्यात आली. त्याबाबत एक कमेटी नेण्यात आली आहे. कमेटीने अहवाल शिक्षणमंत्र्यांकडे सादर केला. तथापि अजूनही कमेटीच्या अहवालासंबंधीचा निर्णय प्रलंबित असल्याची ामहिती अशोक पारधी यांनी सभेत दिली. अनुकंपा तत्वावरची माहिती शिक्षण विभागाकडे अद्यावत तयार आहे. शासनाकडे माहिती सादर करण्यात आली अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. शालेय पोषण आहाराचे इंधन बिल आॅक्टोबर महिन्यापर्यंत पाठविण्यात आलेले आहे. दोन दिवसात सर्व तालुक्याचे बिल मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. तसेच काही शाळांचे बँक खाते क्रमांक चुकीचे आहेत. ते तपासून घेण्यात यावेत. मानव विकास अंतर्गत मिळणाऱ्या सायकलीचे बिल ट्रेझरीमधून काही तांत्रिक कारणामुळे परत आले आहेत. लवकरच मुलींच्या बँक खात्यात रुपये जमा करण्यात येणार आहेत. ज्या शाळांच्या संच मान्यता चुकीच्या झाल्या अशा ४३ शाळांचे आक्षेप पुढे पाठविण्यात आले आहेत. २००४-२००५ पासून नियुक्त झालेल्या उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांना शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणेबंधनकारक असल्याची माहिती शिक्षणाधिकारी थोरात यांनी दिली. काही शाळांची वार्षिक तपासणी शिल्लक आहे. ती तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच अंशदायी पेंशन योजना, राष्ट्रीय शिक्षा अभियान, शाळा मान्यता संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली. सभेला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे, विभागीय कार्याध्यक्ष अशोक पारधी, सचिव जी.एन. टिचकुले, राजू बांते, मनोहर मेश्राम, अविनाश डोमळे, अनमोल देशपांडे, गोपाल बुरडे, सुरेश खोब्रागडे, खेमराज डोये आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
विनाअनुदानित पदांना लवकरच एनओसी मिळणार
By admin | Published: February 10, 2017 12:31 AM