लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावात धूळ उडवत शिरलेली गाडी पूर्ण गावात आवाज जाईल एवढा भोंगा, गाड्यांच्या मागे धावणारी लहान मुलं. गाड्यातून बिल्ले फेकणारी व्यक्ती, रस्त्यात पसरलेली बिल्ले वेचणारी, मारामारी करणारी बालके असा दृष्य बघण्ो दुर्लभ झाला आहे.निवडणूकीत सोशल मिडीया प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू बनला. सगळ्याच पक्षाचे नेते सोशल मिडीया वापरत आहे. याचा प्रभाव अनेक बाबींवर पडला आहे. खरा फटका ग्रामीण भागातील लहान बालकांवर बसलेला आहे. निवडणूकीत प्रामुख्याने प्रचार सामुग्री बिल्ले होय. आता हे बिल्ले दिसने दुर्मिळ झाले आहे. प्रसार माध्यम, इलेक्ट्रानिक्स मिडीया, आता वॉटअॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्ट्राग्राम आदीच्या माध्यमातून अॅन्डराईड मोबाईलद्वारे घराघरात निवडणूकीच्या व इतरही बाबी पोहचत आहे. एक दशकापुर्वी,प्रचारासाठी गावात गाड्या यायच्या, गावभर भोंगा वाजवत फिरायचा, गाडीतून बिल्ले फेकले जायचे, गाडींच्या मागे धावणारी बालके बिल्ले मिळविण्यासाठी धडपड करायची. कधी मारामारी ही करीत होती.गोळा केलेली विविध पक्षाची चिन्हाची बिल्ले बालके निट जमवून ठेवत होती. शेताशेजारी झाडात, कुणाच्या घरी अशी बालकांची अशी मैफिल जमायची. मग, सुरु व्हायचा त्यांचा बिल्ले जिंकण्याचा खेळ. या खेळात ही बालके सगळं विसरुन जायची. या बिल्ल्याच्या खेळात रममाण होणारी ही लहान बालक सोशल मिडीयामुळे दूर झाली. तसेच निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना या लहान बालकांसाठी बिल्ले छापले पाहिजेत.गावात आपल्या कार्यकत्याच्या माध्यमातून बिल्ले वाटली गेली पाहिजेत हा विसर सोशल मिडीयाने हायटेक झालेल्या नेत्यांना पडला आहे. निवडणूक काळात बालकांचा बिल्ल्याचा खेळ घालवायला बालमन जाणणारे नेते नाहीत हे दिसून येते.‘बिल्ले’ हा घराघरात जाणारा प्रचाराचा सोपा माध्यम बंदच झाला. याबाबत मोहगावदेवी येथील बालक अखिलेश लांबट म्हणतो, बिल्ले जमविण्याचा व खेळण्याचा छंद हिरावला गेला. महेंद्र सुर्यवंशी म्हणाला, निवडणूक काळात आठ-दहा मित्र बिल्ले खेळामुळे एकत्र येत होती. आता खेळासह मित्रही दुरावले गेले. युवक लिलाधर लेंडे म्हणाले, नेते बालकांची मानसिकता समजून घेत नाही. तसा विचारही करीत नाही. यामुळे निवडणूकीच्या प्रचाराचा लोळ घरापर्यंत जाणे बंद झाले. तसेच लहान बालकांच्या उत्साहाला खिळ बसली आहे.
बिल्ल्यांच्या मागे धावणारी बच्चे कंपनीही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 10:26 PM
गावात धूळ उडवत शिरलेली गाडी पूर्ण गावात आवाज जाईल एवढा भोंगा, गाड्यांच्या मागे धावणारी लहान मुलं. गाड्यातून बिल्ले फेकणारी व्यक्ती, रस्त्यात पसरलेली बिल्ले वेचणारी, मारामारी करणारी बालके असा दृष्य बघण्ो दुर्लभ झाला आहे.
ठळक मुद्देसोशल मीडियाचा परिणाम : घराघरात पोहचणारे ‘बिल्ले’ झाले झाले लुप्त