शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

सहा महिन्यांपासून मानधन मिळालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:42 PM

शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविणाºया स्वयंपाकीण व मदतनीसाला गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपोषण आहार शिजविणाºया महिलांची व्यथा : इंधन व भाजीपाल्याचाही खर्च मिळाला नाही

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविणाºया स्वयंपाकीण व मदतनीसाला गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रामाणिकपणे काम करुनही तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळत नसेल तर जिवन जगावे तरी कसे? असा सवाल कर्मचारी करीत आहेत.तुमसर शहरासह तालुक्यात एकूण २५३ शाळा आहेत. त्या त्या शाळेच्या पटसंख्येनुसार वर्ग १ ते वर्ग ५ व वर्ग ६ ते वर्ग ८ अशी दोन विभागात विभागणी करुन शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यांनानंतर जेवू घालण्याची योजना शासनाने अमलात आणली. त्यानुसार शालेय व्यवस्थापन समितीकडून अती गरज महिलेला स्वयंपाकीण तसेच मदतनिस म्हणून एक हजार रुपये अशा तुटपुंज्या मानधनावर नियुक्ती करण्यात आली. गावात कोणतेही काम नाही व पोटाची खडगी भरणे ही तितकेच गरजेचे म्हणून त्या गोरगरीब महिलेनी ते काम स्विकारले. पंरतू गत मार्च महिन्यापासून तर आजतागत सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यांना मिळत असलेले तुटपुंजे मानधन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी आली आहे. तर दुसरीकडे शासन, पोषण आहाराकरिता शाळांना किरणा व तांदळज्ञची पुर्तता करते. अन्न शिजविण्याकरिता इंधन व भाजीपाला हे मुख्याध्यापक स्वत:च्या जवाबदारीवर खर्च करुन विद्यार्थ्यांना खावू घालतो. एक महिन्याचे मागणी पत्र सादर केल्यानंतर इंधन व भाजीपाला खर्च हा मुख्याध्यापकांना मिळतो. दर महिन्याच्या एक तारखेला केंद्र प्रमुखंच्या माध्यमातून खर्चाचे मागणी पत्र शालेय पोषण आहार विभागाकडे न चुकता पाठविले जातात. पंरतु त्यानाही मार्च महिन्यापासूनचे इंधन व भाजीपाल खर्च मिळाला नसल्याने मुख्याध्यापकांचीही डोकेदुखी वाढली आहे. शैक्षणिक प्रगत महाराष्टÑाचा गाजावाजा होत आहे. विद्यार्थ्यांत शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून या योजनेची भुमिका महत्वाची असताना मात्र अन्न शिजविणाºया महिलांना सहा महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने तालुक्यात शैक्षणिक प्रगत म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याचा प्रकार जाणवत आहे.