विनायक बुरडे यांचे प्रतिपादन : पालोरा शाळेतील स्नेहसंमेलनाचे उद्घाटनकरडी (पालोरा) : शिक्षणाने सर्वांची प्रगती शक्य आहे. शिक्षणामुळे मानवी जीवनात कमालीचे परिवर्तन झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा ध्यास घ्यावा. जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांच्या तुलनेत कुठेही मागे नाहीत. पालोरा शाळेत सर्व भौतिक सुविधांची पूर्तता आहे. येथील विद्यार्थ्यांनी संशोधनाचा लाभ घेऊन जीवनात यशस्वी व्हावे. शाळेत शिक्षकांची कमतरता असली तरी त्यावर तोडगा काढला जाईल. शाळेच्या प्रगतीवर गावाची व देशाची प्रगती अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे सदैव लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सभापती विनायक बुरडे यांनी केले.पालोरा येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय स्नेहसंमेलन, विज्ञान प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी मोहाडी पंचायत समितीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे होते. उद्घाटन सभापती विनायक बुरडे यांचे हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी माजी जिल्हा परीषद सदस्य के.बी. चौरागडे, उपसभापती विलास गोबाडे, तहसीलदार धनंजय देशमुख, जिल्हा परीषद सदस्य सदस्या सरिता चौरागडे, निलकंठ कायते, पंचायत समिती सदस्य महादेव बुरडे, सरपंच माला मेश्राम, जांभोराचे सरपंच भूपेंद्र पवनकर, केंद्रप्रमुख माथुरकर, अमरकंठ लांडगे, पत्रकार युवराज गोमासे, भोजराम तिजारे, पोलीस पाटील विरेंद्र रंगारी, रामचंद्र मते, भगवान घोनमोडे, योगीता चिंधालोरे, देवनाथ अतकरी, आशिष चिमणे, नानाजी वासनिक, अकलेश कोडापे, योगेश्वर चिंधालोरे, दिनेश मेश्राम, किरण भोयर, हितेश मेश्राम, परसराम काळे, सुनिता हातझाडे, सरिता धांडे, दवळू भोयर, आशालता चिमणे, मालनबाई गजभिये, रवी अतकरी, आरती अतकरी, प्राचार्य सेवकराम शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.पालोरा शाळा तालुक्यातील उत्कृष्ट शाळा आहे. शाळेत मोठ्या प्रमाणात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शाळेचे व्यवस्थापन चांगल्या दर्जाचे असल्याने शाळेचे जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे यांच्या नेतृत्वात प्रगती केली आहे. पालकांची व शिक्षकांची मार्गदर्शकाची भूमिका नेहमीच लाभत असल्याने ग्रामीण भागातील शाळा असताना कुठेही विद्यार्थी मागे नाहीत. विद्यार्थ्यांच्या खेळांकडे व अभ्यासाकडे नियमित लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शन सभापती हरिश्चंद्र बंधाटे यांनी यावेळी केले. तहसीलदार देशमुख यावेळी म्हणाले, यशासाठी कठीण परिश्रम मोलाचे असतात. विद्यार्थ्यांनी त्यासाठी झटत राहिले पाहिजे. आजचे काम आताच करण्याला महत्व देण्याची आवश्यकता आहे.प्राचार्य सेवकराम शेंडे यांनी प्रास्ताविकातून शाळेची माहिती दिली. शाळेत चार शिक्षकांच्या जागा रिक्त असून जिल्हा परिषदेने याकडे लक्ष पुरविण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिक्षकांची कमतरता पूर्ण करण्यासाठी तासिकेवर शिक्षक शाळेत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. उपस्थित पाहुण्यांनी माता सरस्वती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करून लोकांना पाहण्यासाठी प्रदर्शन खुले करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून पाहुण्यांची वाहवा मिळविली. आभार प्रदर्शन के.पी. माने यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक ए.एस. निमजे, यु.आर. हटेवार, शाळा नायक मच्छिंद्र नेवारे, श्वेता धांडे, करण खराबे, व्ही.के. बुरडे, एस.डी.शेंडे, विजयलाक्ष्मी आकरे, शेखर हट्टेवार, एस.एस. टेंभुरकर, संजय वासनिक, प्रकाश भोयर, भोजराम तिजारे व सर्व शिक्षकांनी, पालकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 12:20 AM