शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

आता जनावरांना मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:35 PM

आता माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधारक्रमांक देण्याच्या कार्याला मुरमाडी (तुप) व खुटसावरी येथील पशु चिकित्सालयातर्फे प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देआता माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधारक्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : आता माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधारक्रमांक देण्याच्या कार्याला मुरमाडी (तुप) व खुटसावरी येथील पशु चिकित्सालयातर्फे प्रारंभ झाला आहे.जनावरांना ओळख मिळवून देण्यासाठी शासनाची ही योजना देशभरात राबविली जात आहे. जनावरांची जात, वर्ग, देशी, विदेशी, शिंगे सरळ की वाकडी, शेपूट गोंडा, त्यांचा रंग आदी माहिती या आधार क्रमांकामुळे मिळणार आहे. जनावरांची इत्यंभूत माहिती भविष्यात आधारकार्ड क्रमांकामुळे मिळणार असून दुधाळ जनावरांची माहिती प्रथम संकलीत केली जाणार आहे. जनावरांची माहिती मिळविणे हा हेतू असला तरी गोमातेची कत्तलही या युनिक नंबरमुळे थांबविता येणार आहे. जनावरांचा बारा अंकी विशिष्ट ओळख क्रमांक असलेले आधार कार्ड हे फायबरचे असून ते जनावरांच्या डाव्या कानाला बसविल्या जात आहे. कान कापला किंवा जनावराचा मृत्यू झाला तरच हा टॅग निघेल. जनावरांना स्वत:ची ओळख मिळाल्याने चोरीचे प्रमाण आटोक्यात येतील. विक्री व्यवसायासाठी भविष्यात दाखल्याची गरज राहणार नाही. आधार कार्डानुसार गाय, म्हशीला टॅग दिल्यावर लसीकरण, रेतन, व्यायली कधी, काय जन्मली याबाबतची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या संदर्भात लाखनी परिसरातील मुरमाडी व खुटसावरी पशुचिकित्सालयातर्फे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री राठोड तथा डॉ.लता देशमुख यांनी शासनाच्या या योजनेची अंमलबजावणी मचारणा व खुटसावरी पासून सुरु केली आहे.