चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी प्रशासनाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. काहींनी टिनाचे शेड काढले होते तर अनेकांनी तसेच ठेवले होते. आता मुदतीनंतर प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गावरील १०० फुटापर्यंतचे अवैध बांधकाम, पानठेले, लहान दुकाने, दुकानासमोरील टिनाचे शेड हटविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लाखनीत येत्या काही दिवसात उड्डाणपुलाची समस्या मार्गी लागणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अशोका बिल्डकॉम, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व उड्डाणपुलाचे बांधकाम करणारी जेएमसी कंपनी यांच्या संयुक्तवतीने लाखनी शहरातील व्यापाºयांना अतिक्रमण हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर काही व्यापाºयांनी आवाहनाला प्रतिसाद देत अतिक्रमण हटविले. परंतु प्रतिसाद न देणाºया व्यापारी व दुकानचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम आजपासून आरंभ करण्यात आली आहे. १०० फुटापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग मोकळा करण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू होत असल्यामुळे सर्व्हीस रोडवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे. उड्डाणपुल दोन वर्षात पूर्ण करावयाचे असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार जोमाने कामाला लागले आहेत. या मार्गावर उड्डाणपुलाअभावी लाखनी, मुरमाडी शहरातील अनेकांना जीव गमवावा लागला. जखमींची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. आता उड्डाणपुलाचे बांधकाम होणार असून राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागणार आहे.एप्रिल महिन्यात गेला पाच जणांचा बळी३० एप्रिलच्या रात्री मालीपार येथील जगनाडे यांच्या मुलीचा विवाह लाखनीत होता. त्यादिवशी महामार्गावरच्या एका मंगल कार्यालयासमोर उभे असलेल्या वऱ्हाड्यांना भरधाव ट्रकने चिरडले होते. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेले सात जण आजही त्या जखमा सोसत आहेत. या मार्गावर उड्डाणपुल असता तर त्या निष्पाप जीवांचा बळी गेला नसता. त्यापूर्वी याच मार्गावर अनेक लहानमोठे अपघात घडले आहेत. त्यातही अनेकांचा जीव गेला आहे.पोलीस बंदोबस्तात निर्मूलन मोहीमलाखनीत अतिक्रमण हटविताना कुणीही अडथळा आणू नये, यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कुणाचेही नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच अतिक्रमण धारकांना नोटीस पाठविली होती. तरीसुद्धा अनेकांनी अतिक्रमण हटविले नव्हते. जेव्हा अतिक्रमण काढणारे जेव्हा येथील तेव्हा पाहू, असे म्हणत काहींनी अतिक्रमण कायम ठेवले होते. त्यामुळे प्रशासनाला पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढावे लागत आहे.
आता उड्डाणपूल होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 10:14 PM
लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी प्रशासनाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. काहींनी टिनाचे शेड काढले होते तर अनेकांनी तसेच ठेवले होते.
ठळक मुद्देमहामार्गावरील आठवडी बाजारात बंदोबस्त : लाखनीत अतिक्रमण निर्मूलन मोहीम