बाॅक्स
घाबरुन जाऊ नका, संयम ठेवा
भंडारा शहरासह जिल्ह्यात काेराेना रुग्णांचा विस्फाेट हाेत असला तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासन उपचारासाठी सक्षम आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार केले जातात. घरातील कुणी पाॅझिटिव्ह आल्यास हतबल हाेण्याची गरज नाही. हिंमत ठेवून काेविड रुग्णांवर याेग्य उपचार केले, तर निश्चितच हा आजार बरा हाेताे. मात्र अनेकजण घरातील कुणी पाॅझिटिव्ह आला, तर गाेंधळून जातात. या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेतात. या गाेंधळामुळे रुग्णांचे मनाेबल खचू शकते. यासाठी घाबरुन न जाता सयंम ठेवून याेग्य उपचारासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
काेट
काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी घरी थांबणेच याेग्य आहे. कुणीही कामाव्यक्तिरिक्त बाहेर पडू नये. काेराेना नियमांचे पालन करावे. काेराेनाची लक्षणे असल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. पाॅझिटिव्ह आढळल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच उपचार करावे.
- विनाेद जााधव,
मुख्याधिकारी, नगरपरिषद, भंडारा