लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शासनस्तरावरील आदेशान्वये नगर परीषदच्या अंतर्गत येत असलेल्या अपंगांना तीन टक्के निधी वाटप करण्यासंदर्भात न.प. च्या पदाधिकारी अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तराच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. १४ जूनपर्यंत चर्चा न केल्यास १५ जूनला आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तुमसर नगरपरीषदच्या विरोधात कासरा - तुतारी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने पत्रपरिषदेत देण्यात आला.शासन स्तरावर सर्व नगरपालिका व ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अपंगांना सामान्य फंडाच्या उत्पन्नाच्या तीन टक्के निधी अपंगाच्या कल्याणाकरिता देणाऱ्या सूचना १९९५ च्या शासननिर्णयाप्रमाणे असताना अनेक ठिकाणी याची अंमलबजावणी होत नाही. सदर प्रकार प्रहार संघटनेच्या लक्षात येताच त्यांनी अनेक ठिकाणी निवेदन देऊन तीन टक्के निधी वाटपासंदर्भात चर्चा करुन निवेदन दिले. त्यामुळे अनेक ठिकाणी निधी वाटपाच्या कार्याला सुरुवातही केली. याच अनुषंगाने प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रवी मने व विजय बर्वे यांनी तुमसरचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन भेटण्याचा प्रयत्न केला असता नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी टाळाटाळ केली. चर्चा करण्याचे टाळले. मुख्याधिकारी यांच्या वतीने वहीद खाँ पठाण यांनी आमच्याकडे कासराही नाही व तुतारीही नाही. आम्ही निधी कुठून देणार, अशी भूमिका घेत उत्तरे दिली. त्यामुळे अपंग बांधवांना अपमानीत केले. त्यांना निधी वाटप संदर्भात निवेदन देऊन १४ जूनपर्यंत वेळ देऊन चर्चा करण्याची तयारी दाखवत १४ जूनपर्यंत निर्णय घेण्याची मागणी निवेदनातून केली. अन्यथा १५ जून रोजी प्रहार स्टाईलने संघटनेच्या वतीने पालिकेच्या विरोधात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कासरा तुतारी आंदोलनाचा इशारा पत्रपरिषदेत देण्यात आला.बर्वे यांनी नगरपंचायत लाखनी यांनी ११५ अपंगांना प्रत्येकी १००० चे वाटप केले तर भंडारा येथे २०० च्या वर अपंगांना प्रत्येकी ५००० रुपये वाटप करण्यात आल्याचे यावेळी सांगितले.पत्रपरिषदेला प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मने, विजय बर्वे, तुमसर तालुका अध्यक्ष जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे, सुनिल कहालकर प्रामुख्याने उपस्थित होते.
न.प. विरोधात कासरा - तुतारी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:27 PM
शासनस्तरावरील आदेशान्वये नगर परीषदच्या अंतर्गत येत असलेल्या अपंगांना तीन टक्के निधी वाटप करण्यासंदर्भात न.प. च्या पदाधिकारी अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तराच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देपत्रपरिषद : प्रकरण अपंगांना निधी वाटपाचे, तुमसर न.प. च्या आडकाठी धोरणाचा विरोध