प्रकरण गोपनीय बयान भंगचे : अखेर चौकशी समितीचा अहवाल सादर, कारवाईचा चेंडू सीईओच्या कोर्टातभंडारा : तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनीयता भंग प्रकरणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील (एनआरएचएम) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अश्वीन राघमवार दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने जिल्हा आरोग्य समितीसमोर सादर केलेल्या अहवालात ठेवला आहे. आरोग्य समितीने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा चेंडू मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कोर्टात टाकला आहे. हा अहवाल चौकशी समितीने जिल्हा आरोग्य समितीसमोर २२ जून (बुधवार) ला सादर केला. या अहवालात पहेला येथील पाच कर्मचाऱ्यांचे बयाण नमूद आहे. याच बयाणाच्या धर्तीवर संबधित अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करावी, या आशयाचा तीन पानी अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सीईओ दोषी अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करतात, याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला अंतर्गत असलेल्या उपकेंद्र दवडीपार येथे २२ डिसेंबर २०१५ ला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान कपाटात व टेबलावर अस्तव्यस्त स्थितीत लस आढळून आली होती. ती लस चुकुन बालकांना दिल्या गेली असती तर जीवितहानी झाली असती. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी वरिष्ठांकडे तशी माहिती सादर केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी कार्यरत १० कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने सातत्याने प्रकाशित करून सत्य बाहेर आणले. नोंदविलेले बयान नियमानुसार गोपणीय ठेवले जातात. बयान सार्वजनिक करणे गंभीर बाब आहे. त्यामुळे जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीत पुन्हा दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांनी पहेला प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून संबधितांच्या बयाणांचे रेकॉर्डिगही केले. एकाच प्रकरणाचे तीनदा बयान नोंदविण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे, याप्रकरणात पाठीचा कणा ठरणारे कर्मचाऱ्यांचे ‘बयाण’ सार्वजनिक झाले होते.त्यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले. दरम्यान बालकांसाठी असलेल्या लसीविषयी दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून पहेला येथील कंत्राटी आरोग्य सहायिका वर्षा रामटेके यांचे खमारी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र गोपनीय माहिती सार्वजनिक करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. वरिष्ठांना वाचविण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कारवाइर करण्यात आल्याी खमंग चर्चा खुद्द आरोग्य विभागात होती. लोकमतच्या मालिकेमुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुन्हा बयाण घेण्याचे ठरविण्यात आले. त्यातही सुरूवातील बयाण घेणारे अधिकाऱ्याची चौकशी समितीत निवड करण्यात आली होती.परंतु प्रकरणात कर्मचाऱ्यांचे बयाण सर्वेतोपरी ठरल्याने बयाण भंग करणारे अधिकारी खऱ्या अर्थाने जाळ्यात सापडले आहे. क्षुल्लक प्रकरण सांगणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही एक मोठी चपराक आहे. दरम्यान २२ जून ला चौकशी समितीचे अध्यक्ष प्रदीप बुराडे, सदस्य म्हणून चंद्रप्रकाश दुरुगकर, चंदूलाल पिल्लारे, खंडविकास अधिकारी मंजूषा ठवकर आणि तालुका आरोग्य अधिकारी अनुराधा जूगनाके यांनी आपला अहवाल आरोग्य समितीसमोर सादर केला. यातील दोषीवर सीईओ निर्णय घेणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
‘एनआरएचएम’चा अधिकारी दोषी
By admin | Published: June 25, 2016 12:22 AM