भंडारा : जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून, आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा शून्य आहे. आज ४२१ व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली नाही. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य टक्के आहे. जिल्ह्यात आता केवळ पाच सक्रिय रुग्ण आहेत.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८ हजार ९३९ झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० हजार ७७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ९१७ व्यक्तींच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृतांची संख्या एकूण ११३३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.८९ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ ०.०१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयांत बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राइब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.