शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

जिल्ह्यात हत्तीरुग्णांची संख्या चार हजारांवर

By admin | Published: December 30, 2014 11:27 PM

डासांमुळे हत्तीरोगाची लागण होते. क्युलेस डासाची मादी याचा प्रसार करण्यास कारणीभूत असते. दूषित डास वारंवार चावल्यानंतर हत्तीरोगाची लागण होते. जिल्ह्यात ४,४३१ हत्तीरोग रूग्ण आहे.

प्रशांत देसाई - भंडाराडासांमुळे हत्तीरोगाची लागण होते. क्युलेस डासाची मादी याचा प्रसार करण्यास कारणीभूत असते. दूषित डास वारंवार चावल्यानंतर हत्तीरोगाची लागण होते. जिल्ह्यात ४,४३१ हत्तीरोग रूग्ण आहे. यात पवनी तालुक्यात सर्वाधिक ८७६ रूग्ण असून तुमसर शहरात सर्वात कमी ४९ रूग्ण आहेत. जागतील आरोग्य संघटनेनुसार जगात १२ कोटी लोकांना हत्तीरोग रोगाची लागण झालेली आहे. त्यापैकी ४० टक्के हत्तीरोग रूग्ण भारतातच आहेत. या रोगाचे रूग्ण दगावत नसला, तरी त्यास अत्यंतिक शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हा रोग झाल्यावर बरा होत नसल्याने रुग्णाची त्यातुन सुटका नसते. हत्तीरोगाचे बाह्य लक्षणे व अंडवृद्धी असे दोन प्रकार आहेत. अंडवृद्धीमुळे पुरूषांच्या वैवाहिक जीवनात अडथळा निर्माण होऊ शकतो. भंडारा जिल्ह्यात ४ हजार ४३१ हत्तीरोगाने बाधिकत व्यक्ती आहेत. यात अंडवृद्धीचे ६७८ तर हत्तीरागाने ग्रस्त ३ हजार ७५३ रूग्ण आहेत. पवनी तालुक्यात हत्तीरोगाचे सर्वाधिक ८७६ रूग्ण असून सर्वात कमी ३६६ तुमसर तालुक्यात आहेत. अंडवृद्धीचे सर्वाधिक १३७ रूग्ण साकोली तालुक्यात असून सर्वात कमी ४१ रूग्ण मोहाडी तालुक्यात आहेत. भंडारा शहरात अंडवृद्धीचे २९ रूग्ण असून तुमसर शहरात ७ व पवनी शहरात ६ रूग्ण तर हत्तीरोगाचे भंडारा शहरात ९७, तुमसर ४९ व पवनी शहरात ९८ रूग्ण आहेत.