लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गवाढीचा वेग जरी मंदावला असला तरी अजूनही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी, मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. कारण पोस्ट कोविडची समस्या दिसून येत आहे. परंतू यातून कुणाचा मृत्यू झाला याबाबत नेमकी माहिती नाही. उल्लेखनीय म्हणजे विविध कोविड सेंटरमध्ये खाटांची उपलब्धता असल्याने परत आलेल्या रूग्णांची तिथेच सोय करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सांगितले. पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. मधुमेह, हायपरटेन्शन असणाऱ्यांची लक्षणे तीव्र असतात. शारिरीक किंवा मानसिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणातही आढळण्आाची शक्यता असते. अशा वेळी कोविड पोस्ट रूग्णांची संख्या वाढू शकते. आजपर्यंत बरे झालेल्या रूग्णांपैकी त्याला परत कोरोना झाला आहे, अशी नोंदही नाही.
काय काळजी घेतली जातेआयसोलेशन किंवा कोविड सेंटरमधून सुटी झालेल्या रूग्णांची हवी तशी नोंद नंतर घेतली जात नाही. कारण ते रूग्ण बरे झालेल्या व्यक्तींमध्ये येत असते. अशावेळी नवीन कोविड रूग्णांकडे अधिक लक्ष दिले जाते. मात्र रूग्णाला काही त्रास होत असेल तर त्यांनी रूग्णालयात तपासणी करून घ्यावी असेही आवाहन करण्यात येते.
खाटांची संख्या अधिकपोस्ट कोविड रूग्ण आल्यास त्यांची व्यवस्था आयसोलेशन किंवा अन्यप कोविड सेंटरमध्ये करता येऊ शकते. कारण सध्या जिल्हा रूग्णालयासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाटांची उपल्ब्धता आहे. हेच आमचे पोस्ट कोविड सेंटर्स आहेत. - डॉ. प्रमोद खंडातेजिल्हा शल्य चिकीत्सक, भंडारा