शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

राज्यात शिक्षक समुपदेशकांची संख्या अत्यल्प

By admin | Published: November 22, 2015 12:23 AM

राज्यात शिक्षक समुपदेशकांची संख्या अत्यल्प असल्याची कबुली दस्तुरखुद्द शिक्षण विभागाने दिली आहे.

भंडारा : राज्यात शिक्षक समुपदेशकांची संख्या अत्यल्प असल्याची कबुली दस्तुरखुद्द शिक्षण विभागाने दिली आहे. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई या संस्थेतून व्यवसाय मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील शिक्षक समुपदेशकांची संख्या ५३९ आहे. राज्यातील एकूण शाळा, शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेता समुपदेशन करण्यासाठी पात्र तज्ज्ञ व्यक्तींची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे समुपदेशनाचा लाभ अत्यल्प विद्यार्थ्यांना होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सन २०१५-१६ पासून राज्यातील इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कल चाचणी होणार आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यावर कोणत्या विद्या शाखेत प्रवेश घ्यायचा, त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. अनेकदा क्षमता नसताना एखादा अभ्यासक्रम निवडला जातो. भविष्यात त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्याला व त्याच्या पालकांनाही सहन करावे लागतात. त्यामुळे दहावीत शिकत असतानाच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल समजण्यासाठी आणि त्यांना करियरसाठी मार्गदर्शन करण्यासाठी ही आॅनलाईन चाचणी होणार आहे. त्यातून अत्यल्प समुपदेशक आणि त्यांच्याकडून होणाऱ्या मर्यादित समुपदेशनावर उपाययोजना शोधण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येईल. या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्र निवडीसाठी सहाय्य करून आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. राज्यातील समुपदेशकांची संख्या अत्यल्प असल्याने मानसिक त्रास वाढण्याची शक्यता असल्याने त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)