शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

‘जय’मुळे पवनी तालुक्यात वाघांची संख्या वाढली

By admin | Published: September 25, 2015 12:08 AM

न्यू नागझिरा अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचे अंतर आणि अडथळे पार करून उमरेड कऱ्हांडला ....

पवनी : न्यू नागझिरा अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचे अंतर आणि अडथळे पार करून उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात दोन वर्षापूर्वी ‘जय’ नामक वाघ दाखल झाला आहे. या वाघामुळे अभयारण्यात व पवनी वनपरिक्षेत्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. काही महिन्यापूर्वीच वायगाव बीटमध्ये एका वाघीणीने दोन बछड्यांना जन्म दिल्याने शावकांची संख्या १० च्यावर गेली आहे. यातील पाच शावक पवनी तालुक्यात आहेत.भारदस्त शरीरयष्टीचा साडेचार, पाच वर्षाचा ‘जय’ नामक वाघ या परिसरातील महत्वपूर्ण वाघ ठरला आहे. पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात ‘जय’ दाखल झाल्यानंतर त्याची सर्वप्रथम मैत्री झाली येथील टी - ५ नामक वाघीणीशी. या वाघ वाघीणीचे जोडपे अनेकांच्या दृष्टीस पडले. ‘जय’पासून या वाघीणीला मागील पावसाळ्यापूर्वी दोन शावक जन्माला आले. हे शावक वाघीणींसोबत खेळताना अनेकांनी पाहिले होते.‘जय’ नामक वाघ हा दूरदूरपर्यंत बिनधास्तपणे फिरत असताना उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जंगलातील ‘चांदी’ नामक वाघीणीच्या संपर्कात आला. ‘जय’पासून ‘चांदी’ वाघीणीने चार शावकांना जन्म दिला. याच अभयारण्यातील कुही मांढळजवळील जंगलातील टी-फोर नामक वाघीणीसोबतही ‘जय’ची गट्टी जमली. या वाघीणीनेही दोन शावकांना येथे जन्म दिला. प्रादेशिक वनविभागाच्या रनाळा तलाव परिसरात वाघीणीचे वास्तव्य आहे. या वाघीणीचाही ‘जय’ वाघासोबत संपर्क आला असून या वाघीणीने पवनी वनक्षेत्रातील वायगाव बीटात दोन शावकांना काही महिन्यापूर्वी जन्म दिला. या वाघीणीकडे वनविभाग लक्ष ठेवून आहे. हीच वाघीण दोन शावकांसोबत गुडेगाव नजीकच्या जंगलात फिरत आहे. मागील २० दिवसांपूर्वी जंगलात गेलेल्या या वाघिणीने दोन तरुणांचा पाठलाग केल्यामुळे हे दोन्ही तरुण झाडावर चढून राहिले होते. त्यानंतर वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन राबवून या तरुणांना झाडावरुन खाली काढले. (शहर प्रतिनिधी)