लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मौखीक आजार आणि कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या तंबाखू सेवनात दिवसेंदिवस वाढ होत असून पुरुषांबरोबर आता महिलांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. शहरी महिलांपेक्षा ग्रामीण महिलांत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे वास्तव नागपूर परिमंडळात करण्यात आलेल्या ४० लाख नागरिकांच्या तपासणीतून पुढे आले आहे.देशव्यापी सर्वेक्षणात ४८ टक्के पुरुष आणि २० टक्के स्त्रिया तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. यात पुरुषांमध्ये धुम्रपान करणारे १५ टक्के, धुम्रपान आणि धुम्ररहित तंबाखूचे सेवन करणारे ५ टक्के तर धुम्ररहित तंबाखू पदार्थांचे सेवन करणारे २४ टक्के प्रमाण आहे. महिलांमध्ये धुम्ररहित पदार्थांचे सेवन करणाºयांची संख्या १७ टक्के असून धुम्रपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण १ टक्का आहे.धूम्रपान आणि धूम्ररहित तंबाखूचे सेवन करणाऱ्या महिला २ टक्के आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात पुरुषांचे प्रमाण सारखेच असले तरी महिलांमध्ये तंबाखूसेवनाचे प्रमाण अधिक दिसून येते. त्यावरून नागपूर आणि नाशिक परिमंडळात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मौखीक आरोग्य तपासणी करण्यात आली. नागपूर परिमंडळातील ४० लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात महिलांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले.भंडारा जिल्ह्यात पुरूषांमध्ये तंबाखू खान्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तंबाखू मळून खान्यासोबतच अनेकजण प्रतिष्ठेच्या नावाखाली २० ते २५ रूपयाचा खर्रा खातात. ग्रामीण भागात रस्त्यावरच पानठेले लागले असून त्याठिकाणी खर्रा सहज उपलब्ध आहे. काही पानठेले चालक तर थेट घरपोच सेवा ग्रामीण भागात देत असल्याची माहिती आहे.गांधी जयंतीपासून मौखिक आरोग्य तपासणी मोहीमतंबाखू सेवनाचे दुष्परिणामतोंडाला दुर्गंधी, दात सडणे, हिरड्यांना इजा होणे, चेहºयावर सुरकुत्या पडणे, हाडे ढिसूळ होणे, अशक्तपणा जाणवणे, डोळ्याभोवती काळे वर्तूळ येणे तसेच निकोटीनच्या प्रभावाचा परिणाम मेंदूवर होतो. या प्राथमिक लक्षणासोबतच विविध आजारांसोबतच कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी तंबाखू सेवन थांबवून निरोगी जीवन जगण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी यांनी केले आहे.आरोग्य विभागाच्यावतीने मौखीक आरोग्य तपासणी मोहीम गांधी जयंती २ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत राबविली जाणार आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयासह आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात नि:शुल्क तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसºया व चौथ्या शुक्रवारी उपचारासंबंधात मार्गदर्शन केले जाणार आहे.
महिलांमध्ये वाढतेय तंबाखू सेवानाचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 9:56 PM
मौखीक आजार आणि कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या तंबाखू सेवनात दिवसेंदिवस वाढ होत असून पुरुषांबरोबर आता महिलांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. शहरी महिलांपेक्षा ग्रामीण महिलांत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे वास्तव नागपूर परिमंडळात करण्यात आलेल्या ४० लाख नागरिकांच्या तपासणीतून पुढे आले आहे.
ठळक मुद्देचिंताजनक : नागपूर परिमंडळात ४० लाख नागरिकांच्या तपासणीचे वास्तव