लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय पाठ्यक्रमात प्रवेश देताना ओबीसींच्या जागा इतरांना देऊ केले आहे. त्या जागांवर फक्त आरक्षणाप्रमाणे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. सदर जागा ओबीसी वर्गाच्या कोट्यात तत्काळ परिवर्तीत कराव्या, अशी मागणी ओबीसी क्रांतीमोर्चाने केली आहे.या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना देण्यात आले. निवेदनात नमून केल्याप्रमाणे मंडळ आयोगाने ओबीसीला २७ टक्के आरक्षण दिले आहे. संविधानात व कायद्यातही तशी तरतुद आहे. त्यानुसार वैद्यकिय पाठ्यक्रमात ओबीसी वर्गासाठी ४०६०६४ जागा आरक्षीत आहे. मात्र त्यापैकी महाराष्ट्र सरकारने ३९९५ जागा इतर वर्गांना दिले आहेत. परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना फक्त ६९ जागांवर प्रवेश दिला आहे.हा ओबीसी वर्गांवर झालेला फार मोठा अन्याय असून तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही ओबीसी क्रांतीमोर्चाने दिला आहे. या मोर्चाने ओबीसी वर्गात प्रचंड असंतोष असून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ओबीसींवर झालेला अन्याय तात्काळ दूर करावा अन्यथा ओबीसी क्रांती मोर्चा व इतर ओबीसी संघटना एकत्र येवून तिव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना ओबीसी क्रांतीमोर्चाचे कार्याध्यक्ष संजय मते, जिल्हाध्यक्ष के. झेड. शेंडे, संयोजक सुखराम देशकर, एस. डब्ल्यू ठवकर, एम. आर. भरणे, उमेश मोहतुरे, शत्रुघ्न लिचडे, राहुल दमाहे, पुरुषोत्तम नंदूरकर आदी उपस्थित होते.
आरक्षित जागांवर ओबीसींचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:34 AM
महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय पाठ्यक्रमात प्रवेश देताना ओबीसींच्या जागा इतरांना देऊ केले आहे. त्या जागांवर फक्त आरक्षणाप्रमाणे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. सदर जागा ओबीसी वर्गाच्या कोट्यात तत्काळ परिवर्तीत कराव्या, अशी मागणी ओबीसी क्रांतीमोर्चाने केली आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचे प्रकरण