४९ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या : सीईओंना शासनसेवेत परत बोलाविण्याची मागणीभंडारा : जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा ठपका ठेवून पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर हे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्य यांचेशी संवाद साधताना असभ्य भाषेचा उपयोग करतात. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कोणत्याही विकास कामांना प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींची निवड होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा विकास कामे करण्यास अडचणी येत आहेत. कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकारी यांना वारंवार असभ्य भाषेत बोलून त्यांचा पायउतारा करून कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे. अशा तक्रारी आमच्याकडे कर्मचारी संघटनांनी केलेल्या आहेत. तसेच याबाबत यापूर्वी संघटनांनी आंदोलन, लेखणीबंद इत्यादी केलेले आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब होवून शासकीय योजना ही ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यास फार अडचण निर्माण होत आहे आणि त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी हे जबाबदार आहेत.अशा निष्क्रिय, विकास कामात अडथळा निर्माण करणारे, सहकार्याची भावना नसलेले, वारंवार असभ्य भाषेचा वापर करणारे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची या जिल्हा परिषदेला आवश्यकता नाही. करिता त्यांना परिषद सेवेतून शासन सेवेत शासनाने परत बोलवावे अशी मागणी केली आहे. विनायक बुरडे, पारबता डोंगरे, उत्तमकुमार कळपाते, नीळकंठ टेकाम, शुभांगी रहांगडाले, विवेकानंद कुर्झेकर, होमराज कापगते, रमेश डोंगरे, अशोक कापगते, प्रणाली ठाकरे, नीलिमा इलमे, अर्चना वैद्य, राणी ढेंगे, ज्योती खवास, वर्षा रामटेके, मनोरथा जांभुळे, रेखा वासनिक, वंदना पंधरे, माधुरी हुकरे, प्यारेलाल वाघमारे, नरेश डहारे, धनेंद्र तुरकर, गीता माटे, प्रेरणा तुरकर, प्रतिक्षा कटरे, संगीता सोनवाने, धर्मशिला उके, मंदा गणवीर, मनोहर राऊत, रेखा भुसारी, सुभाष आजबले, रेखा ठाकरे, चित्रा सावरबांधे, रजनी आत्राम, नीळकंठ कायते, चंदुलाल पिलारे, चंद्रप्रकाश दुरुगकर, प्रदीप बुराडे, नेपाल रंगारी, दीपक मेंढे, प्रेमदास वनवे, प्रल्हाद भुरे, रामराव कारेमोरे, संदीप ताले, अरविंद भालाधरे, राजेश डोंगरे, संगीता मुंगुसमारे, हेमंत कोरे, ज्ञानेश्वर रहांगडाले यांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सीईओंविरुद्ध अविश्वास प्रस्ताव
By admin | Published: June 23, 2016 12:20 AM