भंडारा : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजभाषा मराठी दिन साजरा करण्यात आला. मराठी दिनानिमित्त शाळेतील सहशालेय नाविन्यपूर्ण विभागाकडून अनुप्रास अलंकार लेखन स्पर्धा व भुजंगप्रयास वृत्त गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत आठवीच्या श्रीश भोंदे व ऋषिकेश तायवाडे यांनी बाजी मारली. समास, अलंकार, वृत्त या मराठी व्याकरणाचा अभ्यास मुले फक्त परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीच करतात. व्याकरणाचा आनंद घेत मराठीचे अध्ययन करावे, माय मराठीच्या अभ्यासाचा आनंद घ्यावा म्हणून मराठी विषय शिक्षकांनी अशा नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करावे व विद्यार्थ्यांना भाषिक उपक्रमाच्या माध्यमातून विषयाची गोडी लावावी, असे असे मत प्राचार्या केशर बोकडे यांनी व्यक्त केले.
वृत्त व अलंकार स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांनी रस घेऊन सहभाग नोंदवल्याबद्दल माध्यमिक विभागप्रमुख शालिकराम ढवळे, सहशालेय उपक्रम विभागप्रमुख स्मिता गालफाडे, मराठी विषयाचे अध्यापक सुनील खिलोटे, रेखा साठवणे, मराठीच्या अभ्यासक मेधाविनी बोडखे, संस्कृत अध्यापक विजयकुमार बागडकर, अनिल करणकोटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्राचार्य केशर बोकडे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी नामदेव साठवणे, आयोजक योगिता कापगते, ज्येष्ठ शिक्षक शरद बडवाईक, वीणा सिंगणजुडे, शारदा साखरकर, सुनीता ढेंगे, संध्या गिरेपुंजे, आशा भानारकर, पल्लवी करणकोटे, नीशा पडोळे, जयंती - पुण्यतिथी विभाग प्रमुख वैशाली तुमाने, परिचर सुनीता उके, राजकुमार गजभिये उपस्थित होते.