ठळक मुद्देधावपळ सुरु : अधिक वेळ काम, फाईलिंग सुरु, मोहाडी तालुक्यातील अधिकारी तणावात
<p>राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : साहेब, कामासाठी आलोय, आज काम होईल काय? अशी आर्त विनंती करताना कार्यालयात येणारे करतात. पण, आज नाही तीन आॅगस्ट नंतरच बघू असे अधिकारी व कर्मचारी बोलताना दिसतात. आपली काम निट व्हावी यासाठी सगळ्यांची धावपळ होत आहे. ही धावपळ पीआरसी येत असल्याने होत असून सगळेच अधिकारी गतिमान झाल्याचे चित्र मोहाडी येथील विविध कार्यालयात बघायला मिळत आहे.विधानमंडळाची पंचायत राज समिती भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. एकवेळ रद्द झाल्याचा दौºयाचा मुहूर्त काढला गेला. १ आॅगस्ट ते ३ आॅगस्ट पर्यंत जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया पंचायत समिती व विविध प्राथमिक आरोग्य केंद्र ग्राम पंचायती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या भेटीचा कार्यक्रम २ आॅगस्ट रोजी ठरलेला आहे. त्यामुळे पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. आपल्या विभागाची माहिती अद्यावत करण्यात लागले आहेत. एवढेच नाही, फाईलिंग व्यवस्थित करणे, सध्या उपयोगाचे नसणारे रजिस्टर फाईल यांना कापडात बांधण्यात कार्य केला जात आहे. कार्यालयात असणारे कोळीष्टक काढली जात आहेत. साहित्याची ठेवण व्यवस्थित केली जात आहे. बाहेरचा परिक्षेत्र स्वच्छ होत आहे. वाढलेले गवत काढला जात आहे. एकुणच कार्यालयातील कामाची माहिती एकत्रित व अपडेट करणे व बाहेरचा स्वच्छता अभियान या सगळ्या कृतीने कार्यालयाच्या आतील व बाहेरील स्वच्छतेने कायापालट होत आहे. आपले सगळं व्यवस्थित आहे ना याची खात्री करून घेण्यासाठी छोटेखानी बैठका घेतल्या जात आहेत. कार्यालयीन वेळापेक्षा कामासाठी अधिक वेळ दिला जात आहे. एका अधिकाºयांनी तर, आपण सगळे चौथ्या शनिवारी व सुटीच्या रविवार दिवशीही काम करू असे कर्मचाºयांना सांगितले. ही कामाची स्फूर्ती, गती आणली आहे. विधीमंडळाच्या पंचायती राज समितीने कार्यालयाची व नेमून दिलेली कामे, सभा, प्रशिक्षण, मेळावे ३ आॅगस्टच्या पुढे ढकलली गेली आहेत. प्राधान्य केवळ अन् केवळ पीआरसीला दिला जात आहे. पंचायती राज समितीमध्ये समितीप्रमुख आमदार सुधीर पारवे, आ. चरण वाघमारे, आ.अॅड.राहुल कुल, डॉ.सुधाकर भालेराव, भरतशेट गोगावले, राजेश क्षीरसागर, राहुल बोंद्रे, प्रा.विरेंद्र जगताप, राहुल मोटे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, श्रीकांत देशपांडे, बाबूराव पाचर्णे, रणधीर सावरकर, आर.टी. देशमुख, डॉ.सुरेश खोडे, सुधाकर कांबळे, किशोर पाटील, तुकाराम काते, भारत भालके, दिलीप सोपल, दीपक चव्हाण, डॉ.तानाजी सावंत, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील, दत्तात्रय सावंत या आमदारांचा समावेश आहे.‘पीआरसी’च्या धसक्याने अधिकारी झाले गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 9:27 PM