लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : नैसर्गिक गौण खनिज उपसा व पर्यावरणाला हानिकारक प्रकारासंदर्भात शासनाचे कठोर धोरण आहे. मात्र हे धोरण कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील डोंगरगाव हद्दीत बेकायदा राजरोसपणे मुरूम उपसा सुरू असताना तुमसरचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर व मोहाडीचे तहसीलदार देशमुख यांचे मुरूमाच्या अवैध उत्खननाबाबत पाठबळ तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.मुरूमाच्या अवैध खोदकाम बाबत अनेक तक्रार करण्यात आल्या असल्या तरी उपविभागीय अधिकारी, मोहाडीचे तहसीलदार, तलाठी व महसूल प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. जांब, आंधळगाव, मोहाडी ते साकोली पर्यंत राज्य महामार्गाचे कंत्राट शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनी दिल्ली यांना मिळाला आहे. शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीने डोंगरगाव हद्दीतील गट क्रमांक १३२८/१, १३५०, १३२४ या तीन गटात प्रत्येकी ५०० ब्रास प्रमाणे १५०० ब्रासची परवानगी काढली असतांना सहा ते सात फूट खोल व शेकडो मीटर लांब खोदकाम करून अंदाजे सात ते आठ हजार ब्रास जास्तीचा उत्खनन शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आले असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. शिवाय मोठी खोल खदान निर्माण झाल्याने पावसाळ्यात येथे जीवितहानी होण्याची शक्यता आहे.मुरूम उत्खनन करण्याची परवानगी मिळण्याआधीच काही मोठ्या कंपन्या हजारो ब्रास मुरूम, माती उत्खनन करतात. परवानगी एका गटातून ५०० ब्रासची असतांना त्या जागेतून पाच पट अवैध मुरूम खोदकाम करून गावातून वाहतूक केली जाते. कंपनीचे ट्रक यमदूत सारखे गावातून रात्रंदिवस भरधाव जातात. त्यामुळे गावकऱ्यांचा जीव टांगनीला लागला आहे. संबंधित शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनी, प्रा. लिमिटेड या कंपनीवर अवैधपणे उत्खनन केल्याने चौकशी करून दंडात्मक कारवाइी करण्याची मागणी डोंगरगाव येथील गावकºयांनी केली आहे.मुरूम गौण खनिजाचा भाग असल्याने त्यांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असते. त्या माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होतो. शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत सुरु असलेल्या मोहाडी-आंधळगाव-जांब या दरम्यान महामार्गाच्या कामावर मोठ्या प्रमाणात मुरुमाचा अवैध वापर करण्यात येत आहे. ५०० ब्रासची परवानगी मागून पाच दहा पटीने मुरूम नेण्यात येत आहे. डोंगरगाव तलावाजवळ रस्त्याचे काम सुरू असून डोंगरगाव ग्रामपंचायच्या हद्दीतून हजारो ब्रास मुरुमाचा शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीने परवानगी न घेता अवैध मुरूम खोदकाम करण्यात येत आहे. मुरूम खोदकामाबाबत उजर तक्रार, आक्षेप नाही म्हणून शासनाने काढलेले जाहीरनामे ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात प्रसिद्धीसाठी लावण्यात येत नाही. या प्रकारेच बारब्रिक प्रोजेक्ट लिमिटेड रायपूर कंपनी सुध्दा राष्ट्रीय महामर्गाच्या कामावर हजारो ब्रास मुरूम गिळकृत करीत आहे. याकडे नि:स्वार्थपणे शासनाच्या हिताचे रक्षण करणारे भंडाराचे जिल्हाधिकारी यांनी वेळीच शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनी, दिल्ली या कंपनीवर मुरूम खोदकाम केलेल्या जागेचे मोजमाप करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.
मुरुमाच्या अवैध उत्खननाला अधिकाऱ्यांचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:00 PM
मुरूमाच्या अवैध खोदकाम बाबत अनेक तक्रार करण्यात आल्या असल्या तरी उपविभागीय अधिकारी, मोहाडीचे तहसीलदार, तलाठी व महसूल प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. जांब, आंधळगाव, मोहाडी ते साकोली पर्यंत राज्य महामार्गाचे कंत्राट शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनी दिल्ली यांना मिळाला आहे.
ठळक मुद्देडोंगरगाव येथील प्रकार : कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात कारवाईची मागणी