पोलिस निरीक्षकांचा पुढाकार: फिरते पोलीस ठाणे उपक्रमदिघोरी (मोठी) : पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी या गावात दिघोरीचे फिरते पोलीस ठाणे पोहचले. त्याअनुषंगाने मुरमाडीत गेल्या ५ ते ७ वर्षापासूनचे जमिनीचे वाद न्यायालयात पोहचूनही अर्जदार व गैरअर्जदाराचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे पारडी गावात फिरते पोलीस ठाणे पोहचताच येथील नागरिकांना या ठाण्यात तक्रारी नोंदविल्या व त्या तक्रारीचा निपटारा त्याच ठिकाणी करण्यात फिरत्या पोलीस ठाणे पथकाला यश आले.सविस्तर वृत्त असे की, मुरमाडी येथील चंद्रशेखर मुखळू दांबोळे यांचा गुलाब तुळशिराम मेश्राम व मन्साराम कांबळे यांचा जुनाट जमिनीचा घरगुती वाद विकोपाला गेला होता. तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायत कार्यालयानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले तरीपण अर्जदार व गैरअर्जदारांचा यातून कोणताही तोडगा निघाला नाही वारंवार वाद निर्माण होत होते. सरूबाई कांबळे व अनिल मन्साराम कांबळे यांचाही गेल्या ५ वर्षापासून जमिनीचा वाद विकोपाला गेला होता. फिरत्या पोलीस ठाणे उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेदार बबन फसाटे यांनी वादी व प्रतिवादी यांच्या दोहोच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन दोन्ही पक्षांची मत जाणून घेतले व त्यातून तोडगा काढला.ठाणेदारांनी दिलेला न्याय हा अर्जदार व गैरअर्जदारांनी मान्य केल्याने गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला. यानंतर ठाणेदार फसाटे यांनी तंटामुक्त समिती व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना बोलावून त्यांचे लेटरहेडवर निर्णय लिहून घेतला व सर्वांनी या निर्णयाला मान्य केला व ठरावही घेतला.वाद निवळल्यामुळे मुरमाडीच्या ग्रामस्थांनी ठाणेदार बबन फसाटे यांचे कौतुक केले. यापूर्वी दिघोरी मोठी येथे सुद्धा दोन समाजामध्ये जागेचा वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये सुद्धा ठाणेदार फसाटे यांनी पुढाकार घेवून वाद मिळविला होता हे विशेष.
मुरमाडीत जुन्या प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:28 AM
पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी या गावात दिघोरीचे फिरते पोलीस ठाणे पोहचले. त्याअनुषंगाने मुरमाडीत गेल्या ५ ते ७ वर्षापासूनचे जमिनीचे वाद न्यायालयात पोहचूनही अर्जदार व गैरअर्जदाराचे समाधान झाले नव्हते.
ठळक मुद्देपोलिस निरीक्षकांचा पुढाकार: फिरते पोलीस ठाणे उपक्रम