ओम सत्यसाई कला, विज्ञान महावद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, परसोडी येथील सभागृहात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती प्रसंगी शिक्षक दिन म्हणून प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव वाडीभस्मे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर बोर्डचे विभागिय सचिव डॉ.माधुरी सावरकर, सहसचिव चंद्रशेखर गिरडे, कोषाध्यक्ष अरविंद आकरे, प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील उपस्थित होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. डॉ.माधुरीताई सावरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून ध्येय गाठतांना, तसेच ध्येयाची दिशा ठरविताना शिक्षकांचे स्थान किती महत्त्वपूर्ण असते, हे पटवून सांगितले. अध्यक्षीय भाषणात सुभाषराव वाडीभस्मे यांनी परमेश्वर व गुरूमध्ये गुरू हा सर्वश्रेष्ठ ठरतो, तसेच देशाच्या भवितव्याची धुरा शिक्षकाच्या खांद्यावर असते, तसेच शिक्षकच सर्वोत्तम विद्यार्थी घडवित असतो. संचालन प्रा.ज्योती रामटेके यांनी केले. आभार प्रा.दर्शना गिरडे यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा.प्रतीक घुले, प्रा.अरविंद डोंगरे, प्रा.मिथुन मोथरकर, प्रा.चेतन हटवार, प्रा.महादेव हटवार, प्रा.विनोद हजारे, प्रा.सोहम वासनिक, प्रा.हर्षानंद वासेकर, प्रा.राहुल वैद्य, प्रा.डॉ.मंगेश वंजारी, प्रा.ममता वाडीभस्मे, प्रा.आशा आकरे, प्रा.वर्षा दंडारे, प्रा.सोनल गभने, प्रा.सुप्रिया वाडीभस्मे, प्रा.मनीषा वालदे, प्रा.रूपाली रामटेके, प्रा.माधुरी भालाधरे, प्रा.प्रगती सुखदेवे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी महादेव खंडाळे, रामकृष्ण आकरे, कुमुद गोस्वामी, संध्या उरकुडे, तुलाराम वासनिक, दीपक आकरे, चंदा शेंडे यांनी सहकार्य केले.
ओम सत्यसाई कला, विज्ञान महाविद्यालय परसोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:39 AM