लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : राष्ट्रीय महामार्गावर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून लाखनी पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ४१ हजारांची दारू जप्त करण्यात आली. महामार्गावरुन विदेशी दारुची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मंडलवार यांनी सहकार्यासोबत सापळा रचून ही कारवाई केली.रविवारी दुपारच्या दरम्यान लाखनी पोलीस ठाण्याच्या समोर सापळा रचून महामार्गावरुन जाणाºया वाहनांची कसून तपासणी केली असता दुपारी ५ वाजताच्या दरम्यान बोलेरो वाहन क्र. सीजी ७ एक्यू ९२१८ या वाहनातून गोवा बनावटीची विस्की दारुच्या २८ पेट्या एक लाख ४१ हजारांचा माल घेऊन जाणारे वाहन आढळून आल्याने लाखनी पोलिसांनी अवैध दारुबंदी कायद्यान्वये वाहन चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.लाखनी पोलिसांनी वारंवार येणाºया तक्रारीची दखल घेत रस्त्यावर नाकाबंदी केली. यादरम्यान त्यांना कसून चौकशी केली असता दारु वाहतूक करणारे वाहन आढळून आले. यामध्ये आरोपी कुमार पुरुषोत्तम वैष्णव (३०) रा. इंदिरा नगर भिलाई याच्याविरुध्द लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवी, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात लाखनीचे पोलीस निरीक्षक मंडलवार, पोलीस नायक भालेराव, शिवणकर यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर पकडली दीड लाखांची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:36 IST
राष्ट्रीय महामार्गावर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून लाखनी पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ४१ हजारांची दारू जप्त करण्यात आली. महामार्गावरुन विदेशी दारुची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मंडलवार यांनी सहकार्यासोबत सापळा रचून ही कारवाई केली.
राष्ट्रीय महामार्गावर पकडली दीड लाखांची दारू
ठळक मुद्देमुद्देमाल जप्त : छत्तीसगडमधील इसमाला अटक