आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा किसान सभेच्या वतीने सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग व धरणे देण्यात आले. आंदोलनानिमित्त आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी सदानंद इलमे होते. याप्रसंगी भाकपचे शिवकुमार गणवीर, हिवराज उके, शांताबाई बावणकर यांनी मार्गदर्शन केले.किसान सभेचे जिल्हासचिव माधवराव बांते यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यात त्यांनी १२ मार्चला किसान सभेच्या वतीने मुंबई मंत्रालयावर गेलेल्या मोर्च्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुचक समितीच्या वतीने एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग आणि धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत देण्यात आले.मागण्यांमध्ये, शेतकºयांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करा, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकºयांच्या उत्पादित मालाला दिडपट भाव द्या, वन व महसूली जमिनीचे पट्टे जबरान जोतदारांना पट्टे देण्यात यावे व तीन पिढ्यांची अट रद्द करावी, शेतकरी, शेतमजूर, निराधार, असंघटीत कामगार यांना वयाच्या ६० वर्षानंतर पाच हजार रूपये मासिक पेंशन देण्याचा कायदा करा, ६० वर्षाच्या वृद्ध व निराधारांना मिळणाºया आर्थिक मदतीत वाढ करा, आदी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी गोपाल वैद्य, नितीन मोहारे, जयप्रकाश मसरके, वामनराव चांदेवार, केशवराव आगासे, गजानन पाचे, रमेश पंधरे, ग्यानीराम नेवारे, अनिल गाढवे, हेमराज बिरणवार, जगदीश बिरणवार, अशोक दमाहे, बबलु नागपुरे, उमेश लिल्हारे, शिशुपाल अटाळकर, किसन सुर्यवंशी, आदी उपस्थित होते.
अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:21 AM
जिल्हा किसान सभेच्या वतीने सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग व धरणे देण्यात आले. आंदोलनानिमित्त आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी सदानंद इलमे होते.
ठळक मुद्देकिसान सभेतर्फे आयोजन : त्रिमूर्ती चौकात धरणे आंदोलन