अनर्थ टळला : एक गंभीर, साकोलीतील आठवडी बाजार महामार्गावरुन हटवा!साकोली : येथील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रक व मोटारसायकल अपघातात एक ठार तर गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. प्रल्हाद हातझाडे (५२) रा. कोका असे मृतकाचे नाव आहे. अविनाश शंकर गोबाडे (५०) रा. कोका असे गंभीर जखमीचे नाव आहे.प्रल्हाद हातझाडे व अविनाश गोबाडे हे दोघेही दुचाकी क्रमांक एम एच ३६ यु १६१७ ने रस्ता ओलांडित असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक डब्ल्यू बी २३ डी ४३०० ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की घटनास्थळावरुन ट्रकने मोटारसायकल जवळ ४०० मीटर फरफटत नेली. यात प्रल्हाद हातझाडे यांचा जागीच मृत झाला तर अविनाश गोबाडे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. गोबाडे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले. तपास साकोलीचे सहायक पोलीस निरीक्षक वर्मा करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)ट्रक उलटला असता तर...साकोलीचा आजआठवडी बाजार होता. अपघात झाला त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी होती. घटनास्थळावर जर हा ट्रक उलटला असता तर मोठा अनर्थ टळला असता. वाहतुकीला अडथळा साकोलीचा आठवडी बाजार हा महामार्गावर भरत असतो. त्यामुळे दर रविवारी महामार्गावर मोठी गर्दी असते. या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व बरेचदा आठवडी बाजार अपघात होऊन लोकांचा बळी जातो. त्यामुळे हा आठवडी बाजार महामार्गावरुन हटविण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महामार्गावर बॅरिकेट्स नाहीतदर रविवारी रस्त्यावर बाजार भरतो. लोकांची गर्दी असते. हे माहित असूनही पोलीस विभागतर्फे सुरक्षेचा दृष्टीने बॅरिकेट्स लावण्यात येत नाही. उलट बाजाराची दिवशी पोलीस गाड्या थांबवून त्यांना त्रास देतात असा आरोप नागरिकांनी केली आहे.
ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार
By admin | Published: March 06, 2017 12:14 AM