लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील वाहतुकीला देव्हाडी येथील रेल्वेफाटकावरील आॅटो सिग्नल प्रणालीचा फटका बसत आहे. शनिवारी सकाळी १०.३० ते ११ पर्यंत फाटक बंदमुळे वाहनांच्या दुतर्फा अर्धा ते एक किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. येथील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. रेल्वेच्या मशीन कामात तांत्रिक त्रृट्या निर्माण झाल्याने कामे रखडल्याचे समजते.तुमसर-गोंदिया राज्य महामार्ग अत्यंत वर्दळीचा असून मागील चार वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रेल्वे करणाऱ्या कामात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. शनिवारी १०.३० ते ११ वाजता देव्हाडी रेल्वेफाटक बंद होती. दरम्यान चार रेल्वेगाड्या येथून गेल्या. फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा दुतर्फा लागल्या होत्या. दुचाकी-चारचाकी वाहनांच्या वाहतुकीची कोंडी येथे निर्माण झाली होती. सुमारे अर्धा ते एक किमी वाहनांच्या रांगा कमी होण्यास सुमारे अर्धा तास लागला. दरम्यान पुन्हा फाटक बंद करण्यात आली.तुमसर व गोंदिया मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने पर्यायी निमुळता एकेरी रस्ता आहे. एकेरी रस्त्यावर येथे वाहतूक कोंडी नेहमीच होते. पर्यायी रस्ता खड्डेमय झाला आहे. नियमानुसार पर्यायी रस्ता दर्जेदार असावा असे नियम आहे. परंतु येथे खड्ड्यात रस्ता असा प्रत्यय येतो. या रस्त्याने अधिकारी, लोकप्रतिनिधींचे आवागमन आहे. परंतु कुणीच जाब विचारीत नाही, हे विषेश. रेल्वेने तांत्रिक समस्या दूर करून कामाला गती देण्याची गरज आहे.देव्हाडी रेल्वे फाटकावर शनिवारी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. एकेरी पर्यायी रस्ता असून खड्डेमय आहे. याचा फटका वाहनधारकांना बसला. रेल्वेने तांत्रिक समस्या तात्काळ दूर करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.-इंजि. विपील कुंभारी, महासचिव भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटी
रेल्वे फाटकाच्या तांत्रिक बिघाडाने देव्हाडीत वाहनांची एक किमी रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 10:23 PM
तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील वाहतुकीला देव्हाडी येथील रेल्वेफाटकावरील आॅटो सिग्नल प्रणालीचा फटका बसत आहे. शनिवारी सकाळी १०.३० ते ११ पर्यंत फाटक बंदमुळे वाहनांच्या दुतर्फा अर्धा ते एक किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. येथील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. रेल्वेच्या मशीन कामात तांत्रिक त्रृट्या निर्माण झाल्याने कामे रखडल्याचे समजते.
ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : तब्बल अर्धा तास रेल्वे फाटक राहिले बंद