शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

राजापूर जंगलाचा एक किमी परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:49 PM

नाकाडोंगरी वनविभागांतर्गत राजापूर राखीव जंगलात लागलेल्या आगीत एक कि.मी. परिसर भक्ष्यस्थानी सापडल्याचे दिसून येत आहे. या आगीचे कारण गुलदस्त्यात असले तरी तेंदूपत्ता फुटव्यांसाठी ही आग लावण्यात आल्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात : तेंदूपत्ता फुटव्यासाठी आग लावल्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नाकाडोंगरी वनविभागांतर्गत राजापूर राखीव जंगलात लागलेल्या आगीत एक कि.मी. परिसर भक्ष्यस्थानी सापडल्याचे दिसून येत आहे. या आगीचे कारण गुलदस्त्यात असले तरी तेंदूपत्ता फुटव्यांसाठी ही आग लावण्यात आल्याची शक्यता आहे.तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत राजापूर जंगलात शनिवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. रात्रीची वेळ असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते. सुमारे एक कि.मी. परिसरात ही आग पसरल्याने अनेक मौल्यवान वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. विशेष म्हणजे या आगीमुळे राजापूर गावालाही धोका निर्माण झाला होता.नाकाडोंगरी राखीव जंगलात तेंदूपत्ता फुटव्याकरिता लहान झाडे कचरा जाळण्यासाठी आग लावण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच ही आग लागली असावी असा अंदाज आहे. गावापासून एक कि.मी. अंतरावर जंगल धगधगत होते. गावाबाहेर तणसाचे ढिग होते. त्यामुळे धोक्याची शक्यता अधिक होती, अशी माहिती उपसरपंच वसंत बिटलाये यांनी दिली. रात्री घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी फिरकलेही नाही. रविवारी सकाळी नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय व इतर कर्मचारी दाखल झाले. पाहाणी करून कर्मचारी परतले. या संदर्भात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते नॉट रिचेबल होते. सदर राखीव जंगलात मौल्यवान झाडे, वन्यप्राणी आहेत. सातपुडा पर्वतरांगातील हे जंगल आहे. तेंदूपत्त्यासह इतर झाडे मोठ्या संख्येने आहेत. सदर आग तेंदूपत्ता संकलन मोठ्या प्रमाणात व्हावे याकरिता लावण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसचे नेते डॉ.पंकज कारेमोरे यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.