मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील गोबरवाही ते देव्हाडी या २० किलोमीटर रस्ता बांधकामात एक हजार डेरेदार वृद्धांचा बळी जाणार आहे. या रस्त्यासाठी ७५ कोटी ६० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तुमसर शहरातून काँक्रेटीकरण तर उर्वरित रस्ता डांबरी होणार आहे. ब्रिटीशकालीन डेरेदार वृक्ष या रस्त्याचे वैभव असून तेच आता नष्ट होणार आहे.तुमसर-गोबरवाही हा आंतरराज्यीय रस्ता आहे. गोबरवाही ते तुमसर व तुमसर ते देव्हाडी रस्ता बांधकामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. गोबरवाही ते देव्हाडी रस्त्यावर सुमारे एक हजार वृक्ष डौलाने उभे आहेत. डेरेदार वृक्ष उन्हाळ्यात सावलीसाठी महत्वाचे ठरतात. विशेष म्हणजे या रस्त्यावरील वृक्ष या रस्त्याच्या वैभवात भर घालत आहे. परंतु आता विकासाच्या नावावर पहिली कुºहाड पडणार आहे ती या डेरेदार वृक्षावर.वृक्षतोडीसाठी वनविभागाने मंजुरी दिल्याची माहिती आहे. गोबरवाही ते चिंचोलीपर्यंत रस्ता घनदाट जंगलातून जातो. सातपुडा पर्वत रांगांतील हे जंगल राखीव आहे. पुढे हा रस्ता मध्यप्रदेशातील कटंगी बालाघाटकडे जातो. गोबरवाही ते तुमसरपर्यंत सदर रस्ता डांबरीकरण आणि दुपदरी राहणार आहे. तुमसर शहरातील रस्ता सिमेंट काँक्रिटचा तर तुमसर-देव्हाडी रस्ता चौपदरी व डांबरीकरणाचा आहे. येथेही रस्त्याच्या कडेचे वृक्ष तोडले जाणार आहे.येत्या सोमवारपासून तुमसर शहरातून बावनकर चौक ते लोटनपोहा चौकापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता बांधकामाला सुरूवात होणार आहे. शहरातील रस्ता प्रथम बांधण्यात येणार असून डांबरीकरण पावसाळ्यानंतर येणार आहे. मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम होणार असल्याची माहिती आहे. राज्यात व देशात सर्वत्र सिमेंट रस्त्याचे जाळे तयार करण्यात येत आहे. तुमसर ते गोबरवाही हा आंतरराज्यीय रस्ता असून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याची मागणी होत आहे.वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्ते बांधकाम करण्यापुर्वी झाडे लावण्याची गरज होती. परंतु रस्ता बांधकामानंतर झाडे लावण्यात येणार आहे. संबंधित कंत्राटदार झाडे लावल्यानंतर देखरेखीसाठी कोणती व्यवस्था करणार, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते डॉ. पंकज कारेमोरे यांनी केला आहे. झाडांची कत्तल होणार हे निश्चित. मात्र त्याआधी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. परंतु याकडे सर्वत्र दुर्लक्ष होत असून येथेही हाच प्रकार होण्याची शक्यता अधिक आहे.
राज्य महामार्ग बांधकामात एक हजार वृक्षांचा बळी जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 1:05 AM
तुमसर-गोबरवाही हा आंतरराज्यीय रस्ता आहे. गोबरवाही ते तुमसर व तुमसर ते देव्हाडी रस्ता बांधकामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. गोबरवाही ते देव्हाडी रस्त्यावर सुमारे एक हजार वृक्ष डौलाने उभे आहेत. डेरेदार वृक्ष उन्हाळ्यात सावलीसाठी महत्वाचे ठरतात. विशेष म्हणजे या रस्त्यावरील वृक्ष या रस्त्याच्या वैभवात भर घालत आहे.
ठळक मुद्देगोबरवाही ते देव्हाडी रस्ता बांधकाम । ७५ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर