ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे मोबाइल, टॅब व इंटरनेटचा अतिरिक्त भुर्दंड पालकांच्या खिशाला कात्री लावत आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही त्यांना तो घेण्यास भाग पाडत आहेत. अशा स्थितीत त्याला इंटरनेटचीही नितांत गरज असते. त्यामुळे दर महिन्याचा खर्च अधिकच वाढला आहे. आधीच कोरोना संकटात अनेकांचे रोजगार उद्योगधंदे यावर अत्यंत वाईट परिणाम झाला. आता ऑनलाइन शिक्षणामुळे पाल्यांचा शिक्षणाचा खर्च अधिकच वाढला आहे. शालेय फीस, ऑनलाइन शिक्षणाचा भुर्दंड, या दोन्ही बाबी पालकांना सांभाळाव्या लागतात. मात्र, पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे बघून या बाबी करणे ही पालकांना महत्त्वाचे वाटत आहे.
बॉक्स
मोबाइल किंवा संगणक आवश्यक
ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलचे महत्त्व अधिकच वाढले आहे. दररोज येणारा अभ्यासक्रम मोबाइलवरच येत असतो त्यालाच केबलिंग करून इंटरनेटच्या साहाय्याने टॅब किंवा संगणकावर ऑनलाइन शिक्षण सुरू केले जाते. ज्यांच्याकडे संगणक किंवा टॅबची सुविधा नाही. त्यांना फक्त मोबाइलच्या आधार आहे, अशा स्थितीत इंटरनेटची सुविधा चांगली असणे गरजेचे आहे. मात्र, तिथेही इंटरनेट पॅकचा खर्च वाढला आहे.
बॉक्स
कोरोना संकटकाळात आधीच आर्थिक मंदी सतावत होती. अशातच पाल्यांचा ऑनलाइन शिक्षणाचा खर्च वाढला आहे. आता तर बाराही महिने शाळा असते काय? असे भासत आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढला आहे.
-प्रेमानंद कारेमोरे, पालक.
बॉक्स
मोबाइलच्या सतत वापरामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतोय. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ऑनलाइन शिक्षण घेणे एक प्रकारची मजबुरी आहे. शाळा सुरू होतील तेव्हाच यावर तोडगा निघू शकेल.
-ज्योती साखरे, पालक.
बॉक्स
जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी
भंडारा जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, यात दुमत नाही. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करणे म्हणजे अत्यंत जिकरीचे ठरू शकते. राज्य शासनाने अजूनपर्यंत शाळा भरविण्याचा आदेश दिलेले नाही. पालकही कोरोना परिस्थितीमुळे संभ्रमात आहेत. त्यामुळेच ऑनलाइन शिक्षणावर सर्वत्र सध्यातरी भर दिला जात आहे.