शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

आॅनलाईन घोटाळा, आंदोलनाने गाजले वर्ष

By admin | Published: December 29, 2015 2:43 AM

साकोली तालुक्यात यावर्षी एकाहून अनेक घटना घडलेल्या आहेत. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत इंग्रजकालीन तहसिल

संजय साठवणे ल्ल साकोलीसाकोली तालुक्यात यावर्षी एकाहून अनेक घटना घडलेल्या आहेत. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत इंग्रजकालीन तहसिल इमारतीसाठी दुसरी इमारतीचे बांधकाम या दोन गोष्टी कधीही न विसणाऱ्या असल्या तरी यावर्षी पंचायत समितीच्या पॅनेलने आॅनलाईन घोटाळा केला. जांभळी ते मुंडीपार रस्त्यासाठी आंदोलने झाली. एकंदरीत हे वर्ष नवनवीन उपक्रमानेच गाजले.पंचायत समितीच्या रोजगार हमी दिनामार्फत तांत्रिक पॅनेल अधिकारी यांनी सहकार्याच्या मदतीने लाखो रूपयाचा भ्रष्ट्राचार केला. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण तांत्रिक पॅनेलची चौकशी झाली. मात्र साकोली तालुक्यात प्रत्यक्षात किती रूपयाचा भ्रष्टाचार झाला याचा निश्चित आकडा अजुनही पुढे आला नाही. येथील इंग्रजकालीन तहसिल कार्यालयाची इमारत दिवसेंदिवस कमी पडत असल्याने गढकुंभली मार्गावर नवीन इमारत बांधकाम सुरू करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीद्वारे आंदोलन करण्यात आले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी या बांधकामाची चौकशी करून काम बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. जांभळी ते मुंडीपार या पाच कि़मी. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली. या रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी सर्वच पक्षांनी निवेदन देऊन कर्तव्य पार पाडले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. खड्डे आजही कायम आहेत. साकोली उपजिल्हा रुग्णालयात ब्लड आॅन कॉलची सुविधा देण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने ही मागणी मंजुर केली तरी अंमलबजावणी झाली नाही. दिवसेंदिवस साकोलीची लोकसंख्या वाढली. त्यामुळे शासनाने साकोली ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत केली तशी घोषणाही केली. निवडक कार्यक्रमही जाहीर झाला. मात्र यावरही स्थगनादेश आणून नगरपरिषदेची मागणी करण्यात आली. यावर्षी नवे पदाधिकारी व नवे अधिकारी, असाही प्रयोग पाहावयास मिळाली. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर येथील तहसिलदार हंसा मोहने यांचे स्थानांतरण नागपूर येथे करण्यात आले. त्यांच्याठिकाणी शोभाराम मोटघरे आले, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर आले, खंडविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी अशा नव्या अधिकाऱ्यांची तालुक्यात एंट्री झाली आहे.