भंडारा जिल्ह्यात गत आठवड्याभरापासून एक किंवा दाेन व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून येत आहेत. उलट बरे हाेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी हाेत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १५ ॲक्टिव्ह रुग्ण हाेते. त्यात लाखनी व साकाेली येथे प्रत्येकी चार, पवनी येथे तीन, भंडारा दाेन आणि तुमसर व लाखांदूर प्रत्येकी एक ॲक्टिव्ह रुग्ण आहे. माेहाडी तालुक्यात गत पाच दिवसापासून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या निरंक आहे. या ॲक्टिव्ह रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात आलेला रुग्णालयावरील ताण एकदम कमी झाला आहे. जिल्हा प्रशासनालाही माेठा दिलासा मिळत आहे.
शुक्रवारी ४०० व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात पवनी तालुक्यात एकमेव काेराेना रुग्ण आढळून आला. दुसरीकडे तीन जणांनी काेराेनावर मात केली आहे. विशेष म्हणजे गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यात मृत्यूची नाेंद झाली नाही. आतापर्यंत ११३० व्यक्ती काेराेनाने मृत्यूमुखी पडले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णाचे प्रमाण ०.०२ टक्के आहे. मृत्यूदर १.९० टक्के असून, पाॅझिटिव्हिटी रेटही ०.२५ टक्के आहे.
बाॅक्स
५८ हजार ३४७ काेराेनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख २२ हजार ३०८ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५९ हजार ४९२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील ५८ हजार ३४७ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे. त्यात भंडारा तालुक्यातील २४ हजार २२७, माेहाडी ४,२६९, तुमसर ७,००६, पवनी ५,९१०, लाखनी ६,४५७, साकाेली ७,५८९, लाखांदूर २,८८९ व्यक्तींचा समावेश आहे.