देवानंद नंदेश्वर
भंडारा : मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत जिल्ह्यात वेगवेगळ्या टप्प्यात ५४१ शेत रस्ता कामांना मंजुरी मिळाली आहे; परंतु सद्यस्थितीत केवळ २० कामे सुरु आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय कायम असल्याचे दिसते.
गत आठवड्यातील अहवालानुसार जिल्ह्यात मंजूर असलेल्या ५४१ रस्त्यांपैकी ३९९ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान दिली आहे. ३८९ कामांना कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर केवळ २० कामे सुरू करण्यात आली आहे. उर्वरीत कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते.
रस्त्याच्या कामांसाठी पुरक कुशल निधी प्राप्त होण्यासाठी सदर शेत, पाणंद रस्त्यांच्या आराखड्यास शासन स्तरावरून मान्यता घेणे आवश्यक करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात त्यापैकी वेगवेगळ्या ५४१ पाणंद रस्त्याच्या ५४१ कामांना मंजुरी देण्यात आली आहे