आॅनलाईन लोकमतभंडारा : जीवनात शिक्षणाला पर्याय नाही, शिका आणि मोठे व्हावा, असा मुलमंत्र विद्यार्थीदशेत गुरूजणांकडून मिळतो. मात्र शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्यावर रोजगारासाठी भटकंती करावी लागत असल्याचा प्रत्यय जिल्ह्यातील १५० सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर ओढवला आहे.तब्बल वर्षभरापूर्वी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे वाटप करण्याची सभा घेण्यात आली. हे सर्व अभियंते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत नोंदणीकृत आहेत. या सुशिक्षित बरोजगारांना कामे वाटप करण्याकरिता २ फेब्रुवारी २०१७ ला कार्यकारी अभियंता कार्यालयात सभा घेण्यात आली. तब्बल वर्षभरानंतर आज कामांचा वाटपाबाबत पुन्हा एकदा सभा घेण्यात आली. या सभेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना केवळ २२ कामांचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळेच आधीच अभियंता असतानाही बेरोजगार असलेल्या सुशिक्षित अभियंत्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. १५० अभियंते आणि कामे केवळ २२ असा प्रकार घडल्याने संतप्त सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी याविरोधात जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. निवेदन देणाºयांमध्ये राजू कोयडेवार, आदेश मेश्राम, मिथून दहिकर, शुभम दुरूगकर, कृणाल दहिवले, पराग कुंभारे, किशोर हरडे, बिपेश ईश्वरकर, मोनाली बोंद्रे, स्नेहा भवसागर, शालिनी चोपकर, निशा ढवळे, ओमीना धोटे आदी उपस्थित होते.३३ टक्क्यांच्या प्रमाणात वाटपसुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सर्व कामांबाबत ३३ टक्क्यांचे प्रमाण वापरून कामे देण्यात यावे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता यांना लेखीस्वरूपात आश्वासन मागितले आहे. याबाबत आज घेण्यात आलेली सभा रद्द करून बेरोजगार अभियंत्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
१५० अभियंत्यांना केवळ २२ कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:18 PM
जीवनात शिक्षणाला पर्याय नाही, शिका आणि मोठे व्हावा, असा मुलमंत्र विद्यार्थीदशेत गुरूजणांकडून मिळतो.
ठळक मुद्देसुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय : कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन