शनिवारी ८६६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात केवळ तुमसर तालुक्यातील एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला. आता जिल्ह्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९ हजार ४८५ झाली आहे. तर शनिवारी एक व्यक्ती काेराेनामुक्त झाल्याने काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्या ५८ हजार ३२० झाली आहे. जिल्ह्यात कुणाचाही मृत्यू झाला नाही. काेराेनाने जिल्ह्यात आतापर्यंत ११२९ रुग्ण बळी गेले आहेत.
बाॅक्स
५८ हजार ३२० व्यक्ती काेराेनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख १८ हजार ३१० व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ४८५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी ५८ हजार ३२० व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली. भंडारा तालुक्यातील २४ हजार २२२, माेहाडी ४२८८, तुमसर ७००१, पवनी ५९०९, लाखनी ६४५५, साकाेली ७५८२, लाखांदूर २८८५ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहे.
बाक्स
रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.०६ टक्के
जिल्ह्यात रुग्ण बरे हाेण्याचे प्रामण ९८.०४ टक्के आहे. त्यामुळे आराेग्य यंत्रणेला माेठा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ०.०६ टक्के, मृत्यू दर १.९० टक्के आणि पाॅझिटिव्हीटी रेट ०.११ टक्के आहे. यामुळे आराेग्य यंत्रणेवरील माेठा ताण कमी झाला आहे.