लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ९़ ६३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात एक टक्क्यानी वाढ दिसून येते.लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ या प्रकल्पात केवळ १३.२६ टक्के जलसाठा आहे. सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी १८़२५, बघेडा ८़४२, बेटेकर बोथली आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा आठ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ६.९२ टक्के आहे़ गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरीकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ११़७२ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ १ जून २०१८ रोजी ६३ प्रकल्पात १०.५३ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ८.६५ एवढी होती. त्यामुळे टंचाईची तीव्रता वाढलेली आहे.२७ प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाटमागील वर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. प्रकल्पात असलेल्या पाण्याचा योग्य वापर न करता अपव्यय अधिक झाला. परीणामी जिल्ह्यातील २७ प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु, तर १७ माजी मालगुजारी, असे एकुण २७ प्रकल्पांचा समावेश आहे. २७ प्रकल्पांमध्ये बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, डोंगरला, नागठाणा, हिवरा, आमगाव, शिवनीबांध, कुंभली, गुढरी, एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, परसोडी, लवारी, उमरी, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार कोहळी, कन्हेरी, चान्ना, डोंगरगाव, एकलाझरी, दहेगावचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत केवळ नऊ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:18 AM
जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ९़ ६३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला.
ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र : मध्यम प्रकल्प १३, लघु प्रकल्प आठ, तर मामा तलावात सहा टक्के साठा