भंडारा : येथील सहकारनगरातील विपश्यना केंद्रातील विविध समस्यांबाबत अध्यक्ष ओमप्रकाश सलुजा यांच्या अध्यक्षतेखाली विपश्यना केंद्रात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विपश्यना केंद्रातील विविध समस्यांवर विचार विनिमय करण्यात आला. सध्याच्या शहराच्या मध्यभागी विपश्यना केंद्र असल्यामुळे शांतपणे व एकाग्रचित्त भावनेने विपश्यना, साधना करता येत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कारधा येथील पहाडीवर दहा एकर दहा एकर जागेची मागणीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. सदर जागेसाठी नव्याने पुन्हा प्रयत्न करावे लागेल, असे चर्चासत्रात साधकांनी सांगितले. विपश्यना केंद्राच्या जागेसाठी विनायक कोरे यांनी संपूर्ण कागदपत्रे तयार करून शासनाकडे जमिनीसाठी मागणी करण्याचे काम सोपवावे. त्यानुसार विनायक कोरे हे जमीन मागणी प्रस्तावाचा पाठपुरावा करतील, असे ठरविण्यात आले. यावेळी ओमप्रकाश सलुजा, विनायक कोरे, विनोद बोरकर, ब्रम्हपाल चौरे, राजानंद देशभ्रतार, कवळू देशपांडे, सुदर्शन साळवे, राम सलुजा, शालिनी चौव्हाण, गजभिये, दर्शना सलुजा, भालेरावव औरंगाबाद येथील श्रामणेर उपस्थित होते.
विपश्यना केंद्रात समस्याच समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:40 AM