शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

चांदपूर जलाशयाचे पाणी केवळ सात गावांना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 6:00 AM

उन्हाळी धान पिकाच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वितरित करण्यासाठी गत चार महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आक्रमक झाले आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पाणी वाटपाच्या पद्धतीने संतप्त झाले होते.

ठळक मुद्देउर्वरीत पाच गावांना डच्चू। १२०० एकर शेती ओलीताखाली आणणार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धान पिकांच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वितरित करण्यात येणार असून यात उजवा कालव्या अंतर्गत केवळ सात गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. उर्वरित गावांना वगळण्यात आल्याने शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. यामुळे थंडीत पाणी प्रश्न पेटणार आहे.उन्हाळी धान पिकाच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वितरित करण्यासाठी गत चार महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आक्रमक झाले आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पाणी वाटपाच्या पद्धतीने संतप्त झाले होते. रोटेशन पध्दतीने उजवा कालवा अंतर्गत गावांचा समावेश यंदा असला तरी चांदपूर जलाशयात अपेक्षेपेक्षा अधिक पाणी शिल्लक असल्याने डावा कालवा अंतर्गत ५०० एकर शेती ओलीताखाली आणण्याचे निर्णयासाठी शेतकºयांनी बैठकीत गोंधळ घातला होता. या बैठकीत पाणी वाटपासंदर्भात निर्णय झाला नाही. ही बैठक रद्द झाल्याचे घोषित करित पुन्हा बैठक आयोजित होणार असल्याचे सांगण्यात आले. सिहोºयात आयोजित होणाºया बैठकीकडे नजरा लागून असतांना पाटबंधारे विभागाने उजवा कालवा अंतर्गत सात गावांना उन्हाळी धान पिकासाठी पाणी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या सात गावांत दावेझरी, रनेरा, नवेगाव, हरदोली, येरली, रुपेरा, डोंगरला या गावांचा समावेश आहे. या गावांचे शेत शिवारात असणारी १२०० एकर शेती ओलीताखाली येणार आहे. येरली वितरिके अंतर्गत येणारी येरली, नवेगाव, डोंगरला गावे टोलवर आहेत. दरम्यान उजवा कालवा अंतर्गत मोहगाव (खदान), सोनेगाव, बोरगाव, धनेगाव, मच्छेरा, सिहोरा, सिलेगाव, मुरली, कर्कापुर गावांना डच्चू देण्यात आला आहे.डावा कालवा अंतर्गत गावांचा समावेश नाहीउन्हाळी धान पिकांना पाणी वाटपाच्या निर्णयात सात गावांचा समावेश होणार असल्याची अपेक्षा शेतकºयांना होती. परंतु सात गावांना पाणी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रतिक्षेत असणाऱ्या गावांत नाराजीचा सुर आहे. या गावात शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. टेलवर असणाºया येरली वितरिकेला पाणी वाटपाचा निर्णय घेण्यात येवू नये असे लोकप्रतिनिधीची मागणी होती. परंतु ते तोंडघशी पडले आहेत. दरम्यान डावा कालवा अंतर्गत एकाही गावांचा समावेश करण्यात आला नाही.उन्हाळी धान पिकांसाठी सात गावांना पाणी वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे.- सी. जे. हटवार, शाखा अभियंता, सिहोरामोहगाव (खदान) गावाला पाणी वाटपाचे निर्णयातून वगळण्यात आल्याने राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे.- उमेश कटरे, सरपंच, मोहगाव

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय