शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

एकमेव दूरदर्शन प्रसारण केंद्र बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:05 AM

नागपुरसह मुंबई दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राचे कार्यक्रम बघता यावे, यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी दुरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र १९९९ मध्ये उभारण्यात आले.

ठळक मुद्दे‘एफएम’चा विषयही अधांतरी : डिजिटल सेवेला मिळतेय तिलांजली

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : नागपुरसह मुंबई दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राचे कार्यक्रम बघता यावे, यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी दुरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र १९९९ मध्ये उभारण्यात आले. मात्र प्रसार भारतीचे अक्षम्य दुर्लक्ष तथा लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील एकमेव दुरदर्शन केंद बंद होणार आहे. केंद्रासाठी होणारा खर्चही निघत नसल्याचे कारण पुढे करून हा निर्णय दिल्लीवरून घेण्यात आल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. दुसरीकडे या केंद्राचे रूपांतरण ‘डीजीटल टेरिस्ट्रीअल ट्रान्समीटर’ सुरू करून ‘एफएम’ सेवा बळकट करावी, असाही असा सूर उमटत आहे.राज्यात उपेक्षित व मागास जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. नागपूर येथून प्रसारीत होत असणाºया कार्यक्रमांची जिल्ह्यात प्रसारीकरणासाठी ‘फ्रिक्वेन्सी’ योग्य प्रमाणात जिल्ह्यातील गाव खेड्यात पोहचत नसल्याने कार्यक्रमाच्या प्रसारीकरणाला व्यत्यय निर्माण होत होते. त्यामुळे जिल्ह्यात सॅटेलाईटची फिक्वेन्सी योग्य नसल्याने हे केंद्र जिल्ह्यात सुरू करण्यात आले होते. येथे प्रसारभारती ने दूरदर्शन केंद्र १९९९ पासून सुरु केले आहे. तेव्हापासून २००७ पर्यंत दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारण सेवेचे व सह्यांद्री मुंबईचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे दिसत होते. परंतू २००७ नंतर दूरदर्शनवरुन राष्ट्रीय कार्यक्रमाचे व सह्याद्री चॅनलचे कार्यक्रम बंद करुन फक्त दूरदर्शनचे न्यूज चॅनल दाखवू लागले.राज्यात उपेक्षित व मागास जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. नागपूर येथून प्रसारीत होत असणाºया कार्यक्रमांची जिल्ह्यात प्रसारीकरणासाठी ‘फ्रिक्वेन्सी’ योग्य प्रमाणात जिल्ह्यातील गाव खेड्यात पोहचत नसल्याने कार्यक्रमाच्या प्रसारीकरणाला व्यत्यय निर्माण होत होते. त्यामुळे जिल्ह्यात सॅटेलाईटची फिक्वेन्सी योग्य नसल्याने हे केंद्र १९९९ पासून सुरु केले आहे. तेव्हापासून २००७ पर्यंत दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारण सेवेचे व सह्यांद्री मुंबईचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे दिसत होते. परंतू २००७ नंतर दूरदर्शनवरुन राष्ट्रीय कार्यक्रमाचे व सह्याद्री चॅनलचे कार्यक्रम बंद करुन फक्त दूरदर्शनचे न्यूज चॅनल दिसत आहेत.दुसरीकडे ग्रामिण भागात व शहरातही आकाशवाणीचे कार्यक्रम दिसत नाहीत. त्यामुळे दूरदर्शनचे डिजिटल टेरिस्ट्रीअल ट्रांसमिटर लावून आकाशवाणी केंद्र सुरु करा अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी सुचना व प्रसारणमंत्री स्मृति इराणी तसेच आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र मुंबई येथील मुख्य अभियंत्यांना निवेदनाव्दारे केली होती.उपमहानिर्देशकांनी केली होती पाहणीयासंदर्भात नोव्हेंबर महिन्यात आकाशवाणी व दुरदर्शन मुंबईचे उपमहानिर्देशक कामलीयाल व नागपूर येथील अभियांत्रिकी निर्देशकांनी या केंद्राची पाहणी केली होती. यावेळी स्थानिक नागरिकांसह लोककलावंतांनी सदर केंद्र बंद करू नये, अशी मागणीही केली होती. मेंढा परिसरात असलेल्या दूरदर्शन केंद्र योग्य नियोजनाअभावी व शासकीय धोरणाच्या उदासीनतेचा बळी ठरणार आहे. केंद्र बंद झाल्यानंतर येथील अद्ययावत यंत्रणाही हलविण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या शिरपेचात मानाची बाबही हिरावून घेतली जाणार आहे. प्रसारण केंद्राच्या निर्मितीसाठी तेव्हा लक्षावधी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. आता पूर्ववत नवीन तंत्रज्ञान वापरून (‘डीजीटल टेरिस्ट्रीअल ट्रान्समीटर’) सदर केंद्र सुरू करण्यात आल्यास शेतकरी, व्यवसायिक, युवकांना प्रबोधन करणारे ठरू शकते. मात्र, हे स्वप्न अपूर्ण राहणार आहे. त्यामुळे हे केंद्र अद्यायावत करून सुरू करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.पालिकेची आवक बंदमेंढा परिसरात असलेले प्रसार भारतीचे हे दूरदर्शन केंद्र भंडारा नगर पालिकेच्या अखत्यारीतील इमारतीत कार्यरत आहे. मात्र ३१ जानेवारीनंतर सदर केंद्रच बंद होत असल्याने पालिकेची दर महिन्याला किरायापोटी मिळणारी नऊ हजार रूपयांची मिळकतही बंद होणार आहे. एक प्रकारे प्रत्यक्ष फटकाच पालिकेला बसणार आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.