लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विविध योजनेंतर्गत यादीत नाव समाविष्ट करुन देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांनी गडविणाऱ्या ग्राम पंचायत लिपिकाचा भ्रष्टाचार हा ग्रामाभेत गावकऱ्यांनीच उघडकीस आणल्याचा प्रकार लगतच्या आंबागड (मिटेवानी) गट ग्रामपंचायत येथे घडला.आंबागड (मि) येथे गट ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतला आंबागड, दावेझरी, रामपुर, गायमुख व जुना आंबागड या गावाचा समावेश आहे. अनुसूचित जमाती स्त्रियांकरिता सरपंचाचे पद राखीव असल्याने दयावती धर्वुे या महिला सरपंच बनल्या. येथील सरपंचाला अंधारात ठेवून ग्रामविकास अधिकारी . व्ही. एन. कुमेरिया व लिपीक रामेश्वर कामरकर यांनी संगनमताने ग्रा.पं. मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यात घर टॅक्सचे पैसाचा परस्पर वापर, अपंगाना मिळणारी निधी, घरकुलाच्या यादीत नाव समाविष्ठ करण्याकरिता, शौचालय बांधकाम आदी योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी गौडबंगाल केला. त्याच बरोबर योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभाचे धनादेश देण्याकरिता गावकऱ्याकडून अवैधरित्या वसूल करणे, योजनेअंतर्गत असलेले बांधकाम आदी न करता परस्पर पैशाची विल्हेवाट लावण्याच्या प्रकारात वाढ झाली. ५ डिसेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत त्रस्त झालेल्या पाचही गावातील नागरिकांनी सदर प्रकाराचे कथन करताच भ्रष्टाचाराचे बिंग फुटले. आंबागड येथील नागरिक पवन जामुनपाणे, मंसुर शेख, विनोद ठाकरे, जयदेव जामुनपाने यांनी ग्रामसभेची धुरा सांभाळून लिपीक व ग्रामविकास अधिकाºयाला बडतर्फे करयाची मागणी रेटून धरली. बुधवारला झालेल्या ग्रामसभेत कोणताच निर्णय न लागल्याने दुसºया दिवशीही ग्रामसभेला सुरवात झाली.ग्रामसभेत लिपिकावर केलेल्या भ्रष्टाचारचे आरोप दस्ताऐवजानुसार सिध्द झाल्याने सर्वप्रथम ग्रामसभेत लिपीक रामेश्वर कोरमकर याला बडतर्फे केले व त्याचे संपुर्ण अधिकार काढून टाकले. मात्र सहदोषी ग्रामविकास अधिकारी कोणतीच कारवाई न झाल्याने दुसऱ्या दिवशीही उशिरापर्यंत ग्रामसभा सुरुच राहीली. ग्रामसभेला सरपंच दयावती धुर्वे, उपसरपंच सुनील टेंभरे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन ठाकरे, पं.स. सदस्य रेखा धुर्वे, पोलीस पाटील शंकर कांबळे व नागरिक उपस्थित होते.
अन् ग्रामस्थांनीच उघड केला गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:49 AM
विविध योजनेंतर्गत यादीत नाव समाविष्ट करुन देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांनी गडविणाऱ्या ग्राम पंचायत लिपिकाचा भ्रष्टाचार हा ग्रामाभेत गावकऱ्यांनीच उघडकीस आणल्याचा प्रकार लगतच्या आंबागड (मिटेवानी) गट ग्रामपंचायत येथे घडला.
ठळक मुद्देआंबागड येथील प्रकार : लिपिकाला केले बडतर्फ, दोन दिवस गाजली ग्रामसभा