लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर विविध ११ ठिकाणी एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना २४ तास पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यातील सिहोरा, गोबरवाही, सानगडी, दिघोरी, पहेला येथे या एटीएम केंद्राचे लोकार्पण खासदार मधुकर कुकडे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे संचालक कैलाश नशिने, कमाल शेख, हिरालाल नागपुरे, अरविंद राऊत, ढबाले, शैलेश मिश्रा, बांडेबुचे, तुरकर, दिलीप सोनवाने, बाळकृष्ण गाढवे, हरेंद्र राहांगडाले, पत्रकार बेलूरकर, रामदयाल पारधी, रामलाल चौधरी, योगेंद्र हेडाऊ, नरेंद्र बुरडे, सत्यवान हुकरे, सरव्यवस्थापक संजय बरडे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनील फुंडे म्हणाले, बँक शेतकऱ्यांच्या हिताकरिता नेहमीच सकारात्मक काम करीत असते. शेतकऱ्यांची बँक म्हटल्यावर व ग्रामीण बँकेत होणारी गर्दी व ग्राहकांना बँक सेवेचा लागणारा वेळ लक्षात घेऊन जिल्हा बँकेने प्रत्येक शाखेत एटीएम सुरु करण्याचा मानस केला आहे. या सेवेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे आमचे एटीएम कधीही कॅशलेस राहणार नाही. २४ तास पैशाची सुविधा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना खासदार मधुकर कुकडे म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहत असून शेतकºयांना ती आपली बँक वाटते. गोरगरीबांच्या व शेतकऱ्यांच्या हक्काची बँक म्हणून या बँकेची ख्याती आहे.शासनाच्या विविध योजना येथे राबविल्या जाते. जिल्हा बँकेचा डोलारा अध्यक्ष सुनील फुंडे व संचालक मंडळामुळे सुस्थितीत उभा असल्याचे खासदार कुकडे यांनी सांगितले. कार्यक्रमाला ठिकठिकाणचे शेतकरी, बँकेचे ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.सिहोरा येथे एटीएमचा शुभारंभचुल्हाड (सिहोरा) : तुमसर बपेरा राज्य मार्गावरील सिहोरा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत एटीएमचा शुभारंभ खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, संचालक रामलाल पारधी, सरव्यवस्थापक संजय बरडे, पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, माजी सभापती कलाम शेख, हिरालाल नागपुरे, बुरडे, योगेश हेडाऊ, शैलेश मिश्रा, पटेल उपस्थित होते. संचालन व्यवस्थापक मंगेश बोरकर यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११ एटीएमचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 9:35 PM
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर विविध ११ ठिकाणी एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना २४ तास पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांची बँक : २४ तास पैसे मिळण्याची सुविधा