दरम्यान , रोहीत्र पेटी पूर्णत: उघडी असताना संयंत्रातील बिघाड दुरुस्त करताना आवश्यक साहित्याविना कधीकाळी नागरिकांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तथापि, या भागात मोठ्या प्रमाणात कृषी वीज पंपाने दरवर्षीच उन्हाळी धानाचे सिंचन केले जात असताना भारनियमनाच्या संकटात रात्रीच्या सुमारास बिघाड आल्यास वीज कर्मचाऱ्याविना शेतकरीच रोहीत्र पेटीतील बिघाड दुरुस्ती करीत असल्याच्या चर्चेने सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे.
एवढेच नव्हे तर गावालगत असलेल्या या रोहित्राच्या सभोवताल गवत व झुडपे असल्याने या परिसरात पाली जनावरेदेखील वावरत असल्याने संबंधितानादेखील धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंबंधी गैरप्रकारामुळे भविष्यात कोणतीही जीवित अथवा प्राणहानी टाळण्यासाठी येथील गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी अनेकदा येथील रोहीत्र पेटी बदलण्याची मागणी केली; मात्र वीज कंपनीकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप करून संभाव्य धोका टाळण्यासाठी तत्काळ नवीन रोहीत्र पेटी लावून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.