शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

निंदकांमुळे सुधारण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:14 PM

मानव धर्माचा सेवक तत्त्व, नियमाने चालला पाहिजे. प्रार्थना, विनंती व प्रणाम येत नसणारे सेवक आजही आहेत, असे सेवक खरे नाहीत. सेवक कोणाचाही असो शेवटी तो बाबांचाच आहे. निंदकांमुळे सुधारण्याची संधी मिळते. प्रत्येक आत्म्यात भगवान आहे. चांगल्या लोकांचा विचार करुन दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा. वाईट विचार काढा. मनातील मळ स्वच्छ करु शकाल तरच परमात्म्याचे दर्शन होईल, असे प्रतिपादन मानव धर्म प्रसार व प्रसारीका लता बुरडे यांनी केले.

ठळक मुद्देलता बुरडे : मोहाडी येथे सेवक संमेलन, परराज्यासह विदर्भातील ६० हजार सेवकांचा मेळा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मानव धर्माचा सेवक तत्त्व, नियमाने चालला पाहिजे. प्रार्थना, विनंती व प्रणाम येत नसणारे सेवक आजही आहेत, असे सेवक खरे नाहीत. सेवक कोणाचाही असो शेवटी तो बाबांचाच आहे. निंदकांमुळे सुधारण्याची संधी मिळते. प्रत्येक आत्म्यात भगवान आहे. चांगल्या लोकांचा विचार करुन दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा. वाईट विचार काढा. मनातील मळ स्वच्छ करु शकाल तरच परमात्म्याचे दर्शन होईल, असे प्रतिपादन मानव धर्म प्रसार व प्रसारीका लता बुरडे यांनी केले.बहुउद्देशिय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने मंडळाच्या सांस्कृतिक भवनात भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष यशवंत ढबाले, उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, कंठीराम पडारे, राजू पिल्लारे, खासदार मधुकर कूकडे, मनोहरभाई अ‍ॅकेडमीच्या वर्षा पटेल, गिता बोकडे, राजू कारेमोरे, अक्षय उरकुडे, नरेश ईश्वरकर, के. के. पंचबुध्दे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, रिता हलमारे, नरेंद्र भोंडेकर, सरस्वता माटे, विजय चाचीरे, विलास चौधरी, भजनलाल पधा, गोपाल धार्मिक, भालचंद्र पुसदेकर, रामभाऊ मोहतुरे, रामरतन वैद्य, नाना दमाहे, किशोर चौधरी, मधुकर वैद्य, उदाराम पिकलमुंडे आदींचा व्यासपिठावर उपस्थिती होती.जगाला जिंकण्याची शक्ती प्रेमात आहे. या शक्तीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करा असे इंजि. विजय चाचीरे यांनी सांगितले. के. के. पंचबुध्दे म्हणाले, बाबानी, महिलांना जीवन जगण्याचे सन्मान मिळवून दिले. बाबांनी, महिलांना जीवन जगण्याचे सन्मान मिळवून दिले. व्यसनमुक्तीचे मोठे कार्य केले. खासदार कुकडे यांनी, जुमदेव बाबांचे कार्य गरीबांच्या, समाजाच्या कल्याणासाठी होते.व्यसनमुक्तीसाठी शासन असफल ठरले, तर मानवधर्माच्या माध्यमातून अनेकजण व्यसनमुक्त होवून सुखी झाल्याचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. मंडळाचे अध्यक्ष यशवंत ढबाले यांनी अध्यक्षीय भाषणातून सेवकांचे दु:ख दूर कसे झाले याचे उदाहरण देवून तत्वाचे विश्लेषण केले. प्रास्ताविक मंडळाचे सचिव मोरेश्वर सार्वे यांनी केले.यावेळी शिवानी बुरडे यांच्या चमुचा स्वागतनृत्य सादर करण्यात आला. तसचे मोहगाव देवी येथील अर्पिता आंबिलकर व तिच्या संचाने नृत्य सादर केला. यावेळी मंडळाकडून खासदार मधुकर कुकडे, वर्षा पटेल, राजू कारेमोरे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, के. के. पंचबुध्दे आदींचा सत्कार शाल श्रीफळ देवून करण्यात आला. नगरात शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात प्रथम क्रमांक गौरव पोटभरे यांना देण्यात आला. द्वितीय देवेंद्र नागफासे जांब, तृतीय अरुण आकरे निमखेडा, चतुर्थ रामकृष्ण बुराडे मुंढरी, पाचवा सुनिल ठाकरे बेरडीपार, सहावा रुपेश आथीलकर पारडी, सातवा रघुनाथ इलमे भिकारखेडा यांना रोख रक्कम व स्मृती चिन्ह देण्यात आला. प्रोत्साहन बक्षीस सहसराम कुकडे, रामेश्वर बिलवने, वसंता मोहनकर, ईश्वर पोटफोडे, जयराम माहुले यांना देण्यात आला. सेवक मंडळाच्यावतीने आध्यातिम्क प्रमुख लताताई बुरडे यांना आध्यात्मिक रत्न या पदवीने सन्मानित करण्यात आले.सेवक संमेलनात भंडारा, गोंदिया, नागपूर, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी ठिकाणाहून सुमारे पन्नास ते साठ हजार सेवक मंडळी उपस्थित होते.