शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

विरोध मुख्यमंत्र्यांच्या सभेला नव्हे तर झाडे तोडण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 10:17 PM

मुख्यमंत्र्यांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. या कार्यक्रमाम ते आमच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कारही करणार आहेत.

ठळक मुद्देपंकज कारेमोरे : प्रकरण तुमसर येथील जागेच्या वादाचे

आॅनलाईन लोकमततुमसर : मुख्यमंत्र्यांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. या कार्यक्रमाम ते आमच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कारही करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला आमचा विरोध नाही मी लावलेली झाडे तोडण्याला आपला विरोध असल्याचे डॉ.पंकज कारेमोरे यांनी आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.नगर पालिकेचा शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची सभा कमी क्षमतेच्या व दाट लोकवस्तीतील संताजी सभागृहाच्या बाजुला प्रांगणावर आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ७० झाडांची कत्तल केली आणि आता सर्व नियम धाब्यावर बसवून माझ्या मॅटरनिटी हॉस्पीटलसमोर सभा घेऊन ध्वनी प्रदूषनाने नवजात बालकांचा बळी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप डॉ.कारेमोरे यांनी केला.तुमसर नगर परिषदेला १५० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम हा संताजी सभागृहाच्या बाजुच्या प्रांगणावर होत आहे. सदर प्रांगण कमी क्षमतेचा तर आहेच त्याशिवाय तो दाटलोकवस्तीत आहे. रस्ते अरूंद आहेत. तिथे पार्किंगची जागा नाही. तरीही मुख्यमंत्र्यांची सभा त्याठिकाणी घेण्यात येत आहे. तिथे आपण १५ ते २० फूट उंचीचे ७० झाडे स्वखर्चाने लावले आहे.एकीकडे शासन वृक्षारोपणाकरीता कोट्यवधी खर्च करीत असताना त्या वृक्षांची कत्तल स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आदेशावरून होत आहे. आता ते नवजात बालकाचा बळी घेऊ पाहत आहेत. या परिसरात अनेक रूग्णालये आहेत. दवाखान्यासमोर हॉर्न वाजविण्यावर कायद्याने बंदी आहे. तरीदेखील माझ्या मॅटरनिटी दवाखान्यासमोर दिवसभर मोठमोठ्याने स्पिकर वाजवून ध्वनी प्रदूषनाने नवजात बालकांचे हार्टबिट वाढून त्यांचा जिविताला धोका निर्माण होतो.झाडे लावून अतिक्रमण करीत असल्याचा आ.चरण वाघमारे यांच्या आरोपाचे खंडन करताना डॉ.कारेमोरे म्हणाले, झाडे लावल्याने अतिक्रमण झाल्याचे आजपर्यंतचा इतिहास नाही मी तिथे बांधकाम केले असेल तर दाखवावे. आ. चरण वाघमारे यांनी झाडांची कत्तल केली नाही तर दुसरीकडे हलविले असे सांगत असतील तर त्यांनी ती झाडे दाखवावी, असे खुले आव्हानही डॉ. पंकज कारेमोरे यांनी आ.वाघमारे यांना दिले आहे.सदर प्रांगणात जागा बळकाविण्यासाठी प्रांगणाच्या मधोमध कारेमोरे यांनी झाडे लावली. त्यावेळी मी स्वत: जावून झाडे दुसरीकडे लावण्यासाठी सांगितले. परंतु हमरीतुमरी करून त्यांनी प्रागंणाच्या मधोमध झाडे लावली. त्यामुळे ती झाडे काढून सभोवताल लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विरोध केला.- प्रदीप पडोळे,नगराध्यक्ष तुमसर.