लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरातील काही राष्ट्रीयकृत बँकात सुटी (चिल्लर) नाणी घेण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार दीड महिन्यांपासून सुरु असून याबाबत एका तरुणाने थेट रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे तक्रार केली. त्यावरुन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने संबंधित बँकेवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. यामुळे राष्ट्रीयकृत बँकात एकच खळबळ उडाली आहे.तुमसर शहरात राष्टष्ट्रीयकृत बँकाची संख्या मोठी आहे. सर्वच खातेदारांचे खाते या बँकामध्ये आहे. शहरातील खातेदारांने सुटे नाणे बँकेत नेल्यावर त्यांच्याकडून ते घेण्यास नकार दिला जातो. त्यामुळे खातेदारकात असंतोष पसरला आहे. याप्रकरणी शहरातील जागरुक खातेदार नितीन बांगडकर यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याकडे व्टिटवरुन तक्रार केली. त्याची दखल उर्जित पटेल यांनी घेतली आहे. पटेल यांनी तक्रारकर्ते बांगडकर यांना पाठविलेल्या व्टिटमध्ये तुमसरमधील राष्ट्रीयकृत बँकेत सुरु असलेल्या प्रकाराबाबत गंभीर दखल घेत कारवाई करण्यात येणार असल्याचे लिहिले आहे.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या आदेशाने आता तुमसर शहरातील राष्ट्रीय बँक प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. एखाद्या तालुकास्तरावरील ग्राहकाच्या तक्रारीची थेट गव्हर्नरने दखल घेण्याची ही पहलीच घटना आहे.बाजारात सुटी नाणी वाढलीगत काही महिन्यांपासून तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील बाजारात मोठ्या प्रमाणात सुटे नाणे आले आहेत. त्यामागचे गुढ अद्यापही कायम आहे. एकीकडे बँका सुटे पैसे स्विकारत नाही आणि बाजारात पिशवीत घेऊन जायचे काय? असा प्रश्न ग्राहकांपुढे निर्माण झाला आहे.
‘त्या’ राष्ट्रीयकृत बँकेवर कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 9:58 PM
शहरातील काही राष्ट्रीयकृत बँकात सुटी (चिल्लर) नाणी घेण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार दीड महिन्यांपासून सुरु असून याबाबत एका तरुणाने थेट रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे तक्रार केली. त्यावरुन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने संबंधित बँकेवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. यामुळे राष्ट्रीयकृत बँकात एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देसुटी नाणी घेण्यास नकार : तुमसरच्या तरुणाची रिझर्व्ह बँक गव्हर्नरकडे तक्रार